प्रधान सचिव (कृषी) एकणाथ डवले यांचा लोहारा तालुक्यात पीक पाहणी दौरा

0
प्रधान सचिव (कृषी) एकणाथ डवले यांचा लोहारा तालुक्यात पीक पाहणी दौरा

लोहारा/प्रतिनिधी
प्रधान सचिव(कृषी) एकणाथ डवले यांनी लोहारा तालुक्यात सततच्या पावसामुळे,गोगलगाय किडीमुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष शेतावर जाऊन दि.21 ऑगस्ट 2022 रोजी पाहणी केली. या दौऱ्यावर मौजे मार्डी येथे शकुंतला जाधव,उत्तम कदम यांच्या शेतावर सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची तर मौजे चिंचोली काटे येथे शिवाजी गोविंद बिराजदार यांच्या शेतावर बीबीएफ वरील सोयाबीन, विठ्ठल रामचंद्र मुसांडे यांच्या शेतावर सततच्या पावसामुळे झालेले नुकसान तर दत्तात्रय भीमराव सुतार यांच्या शेतावर गोगलगाय मुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी बोलताना एकनाथ डवले म्हणाले की, शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाची कास धरत रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी करणे येथून पुढे फायद्याचे ठरणार आहे. या दौऱ्यादरम्यान उपविभागीय कृषी अधिकारी उमेश बिराजदार, उपविभागीय अधिकारी गणेश पवार, कृषी उपसंचालक अभिमन्यू काशीद, तहसीलदार संतोष रुईकर, तालुका कृषी अधिकारी मिलिंद बीडबाग, सहाय्यक गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर मुळे, मंडळ कृषी अधिकारी ज्ञानेश्वर रितापुरे, शिवाजी ताराळकर व शेतकरी, लोकप्रतिनिधी,महसुल विभाग, कृषी विभाग, जिल्हा परिषद व इतर यंत्रणेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top