ऑल इंडिया पॅथर सेनेचे जिल्हा परिषद समोर बेमुदत उपोषण
14 वा वित्त आयोग व महिला बालविकास योजनेअंतर्गत चौकशी करून कार्यवाही करणेबाबत.
1) ग्रामपंचायत कार्यालय कोल्हेगाव तालुका जिल्हा उस्मानाबाद यांनी 14 वा वित्त आयोगा अंतर्गत केलेल्या कामाचे 2017 ते 2022 चौकशी करण्यात यावी.
2) ग्रामपंचायत कार्यालय कोल्हेगाव ताजी उस्मानाबाद यांनी 2017 ते 2022 या काळात महिला व बालविकास योजनेअंतर्गत लाभार्थ्याची बोगस नावे दाखवून निधी हळप केला आहे याची चौकशी करण्यात यावी.
3) यावर नेमण्यात आलेल्या चौकशी अधिकाऱ्यांनी योग्य प्रकारे चौकशी न केल्यामुळे त्याच्यावरही प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी
तसेच उपरोक्त विषयी चौकशीबाबत तीन वेळा अर्ज देण्यात आला पण याकडे श्री राहुल गुप्ता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद उस्मानाबाद यांनी योग्य प्रकारे लक्ष दिले नाही त्यामुळे नियोजित वेळेनुसार 29 -8- 2022 सायंकाळी 5 वाजेपासून जिल्हा परिषद उस्मानाबाद समोर उपोषण सुरू करण्यात येत आहे तरी उपरोक्त विषयी सर्वांचे चौकशी करून यावर योग्य कार्यवाही करण्यात यावी. असे निवेदन देण्यात आले.
यावेळी उपोषण कर्ते :- ऑल इंडिया पॅथर सेना युवक जिल्हाध्यक्ष यशपाल गायकवाड, विजय गायकवाड