शिवसेनेचे माजी खा.प्रा‌. रविंद्र गायकवाड शिंदे गटात सहभागी, उध्दव ठाकरे गटाला मोठा फटका

0

शिवसेनेचे माजी खा.प्रा‌. रविंद्र गायकवाड शिंदे गटात सहभागी, उध्दव ठाकरे गटाला मोठा फटका

लोहारा/प्रतिनिधी
शिवसेनेचे माजी खा.प्रा. रविंद्र गायकवाड यांनी मुंबई येथे मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिंदे गटात सहभागी झाले आहेत. आ.ज्ञानराज चौगुले यांची शीरर्शा
यावेळी कामी आली. माजी खा.प्रा.गायकवाड शिंदे गटात सामील झाल्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा फटका बसला आहे. तुमचा योग्य तो मान सन्मान राखला जाईल,
असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

आपण पक्षाचे कार्य करत रहा आपणास नक्कीच सन्मान पुर्वक वागणुक मिळेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. यावेळी खा.प्रताप जाधव, खा.श्रीरंग बारणे, आ.संजय 
सिरसाठ, आ.ज्ञानराज चौगुले, भाजपा तालुकाध्यक्ष अजित पिंगळे कळंब, उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top