जुगार विरोधी आनंद नगर पोलिसांची उस्मानाबाद शहरात कारवाई

0

 जुगार विरोधी आनंद नगर पोलिसांची उस्मानाबाद शहरात कारवाई

उस्मानाबाद : जुगार विरोधी कारवाई दरम्यान आनंदनगर पो.ठा. च्या पथकाने दि. 22 ऑगस्ट रोजी 20.45 वा. सु. रामनगर, उस्मानाबाद येथील रस्त्याकडेला छापा टाकला. यावेळी उस्मानाबाद ग्रामस्थ- संतोष पवार हे मुंबई मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 1,140 ₹ रोख रक्कम बाळगलेले असताना पथकास आढळले. 


यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत आनंदनगर पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top