उस्मानाबाद जिल्ह्यात दोन मुलींचा विनयभंग सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
उस्मानाबाद : एका गावातील 14 व 13 वर्षीय अशा दोन्ही बहिणी (नाव- गाव गोपनीय) दि.19 ऑगस्ट रोजी शाळेतून घरी परतत असताना त्याच गावातील तीन तरुणांनी त्यांना अडवून त्या दोघींस लज्जा वाटेल असे कृत्य करुन त्यांचा विनयभंग केला. यावर त्या मुलींच्या कुटूंबीयांनी त्या तीघांना जाब विचारला असता त्या तीघांसह त्यांच्या अन्य तीन साथीदारांनी दि. 22 ऑगस्ट रोजी त्या मुलींच्या घरासमोर तलवार व सुरी घेउन जाउन मुलींच्या पित्यास शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच घराच्या दरवाजावर लाथा मारुन तेथून पसार झाले. अशा मजकुराच्या त्या मुलींच्या पालकाच्या प्रथम खबरेवरुन गुन्हा नोंदवला आहे.
सहा तरुण आरोपी (नाव- गाव गोपनीय) विरोधात भा.दं.सं. कलम- 354, 143, 147, 148, 149, 504, 506 सह पोक्सो कायदा कलम- 12 व शस्त्र कायदा कलम- 4,25 नुसार परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस माहिती कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.