सम्रद्ध जीवन मल्टिस्टेट मल्टिपर्पज कंपनी लिमिटेड मधील गुंतवणूक दारांची गुंतवणूक परत मिळावी यासाठी मनसेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
मुंबई :- आज दि 23/08/22 रोजी विधान भवन मुंबई येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा ना एकनाथजी शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना उस्मानाबाद जिल्हा च्या वतीने सम्रद्ध जीवन मल्टिस्टेट मल्टिपर्पज कंपनी लिमिटेड पुणे या कंपनी मध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूक दारांची गुंतवणूक परत मिळावी यासाठी, शासनाने सम्रद्ध जीवन या कंपनीच्या ताब्यात घेतलेल्या स्थावर मालमत्ता विक्री करावी, व तसेच या कंपनीच्या बँकेमध्ये असलेल्या ठेवी आणि रोख रक्कमेवर लावलेले निर्बंध उठवून सर्व गुंतवणूक दाराना रक्कम परत करावी.
तसेच सर्व लाभधारकांना वैयक्तिक स्थानिक पातळीवर पोलीस ठाण्यात Buds act 2019 या कायद्यानुसार तक्रारी दाखल करून घेण्यासाठी बंधनकारक करावे.
या मागणीसाठी उमरगा लोहारा विधानसभा आमदार मा ज्ञानराज चौगुले सर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष मा शाहुराज माने,श्री प्रशांत गरड,श्री दिलीप गरड,श्री महादेव भोसले यांनी निवेदन दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी यावर तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात येतील असे आश्वासन यावेळी दिले.