उस्मानाबाद शहरात संत सेना महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी

0

उस्मानाबाद शहरात संत सेना महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी, आमदार कैलास पाटील यांच्या निधीतून सभामंडपासाठी सात लक्ष निधी

उस्मानाबाद : शहरातील संत सेना महाराज यांच्या मंदिरात संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी मोठ्या मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी पुण्यतिथीनिमित्त आमदार कैलास पाटील यांच्या निधीतून सात लक्ष निधी संत सेना महाराज सभामंडपासाठी देण्यात आला.

 यावेळी उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर व माजी नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांच्या हस्ते पत्र देण्यात आले यावेळी नाभिक समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 यावेळी दत्तात्रय भालेकर यांच्यावतीने पुण्यतिथीनिमित्त भागवताचार्य विठ्ठल महाराज गाडगे यांचे काल्याचे किर्तन झाले व महाप्रसादने कार्यक्रमाची सांगता झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top