वीस हजाराची लाच स्वीकारताना उमरगात तहसीलदारास उस्मानाबाद लाच लुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले

0


२० हजाराची लाच स्वीकारताना उमरगात तहसीलदारास उस्मानाबाद लाच लुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले
                                 

उस्मानाबाद :-  तक्रारदार :-  पुरुष, वय- 39 वर्षे ( नाव गोपनीय )  यांना त्यांच्या शेतामध्ये घराचे बांधकाम करायचे असल्याने त्यांना चार ट्रक वाळूची आवश्यकता होती.म्हणून तक्रारदार हे आज रोजी पंचांसह लोकसेवकाची भेट घेण्यासाठी त्यांचे शासकीय निवासस्थानी जाऊन याबाबत त्यांना बोलले असता लोकसेवक राहुल मधुकर पाटील,वय 48 वर्षे  पद :- तहसीलदार, उमरगा ता.उमरगा जि. उस्मानाबाद (वर्ग-1) यांनी  मध्यस्थी मार्फत चार ट्रक वाळू घेण्यासाठी व त्या वाहनावर कोणतीही कारवाई  न करण्यासाठी  तक्रारदार  यांना एका ट्रकला 5000/- रुपये प्रमाणे चार ट्रक वाळूसाठी 20,000/- रुपये लाचेची मागणी करून लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले व 20,000/- लाच रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली. अशी माहिती उस्मानाबाद लाच लुचपत प्रतिबंध विभागाने दिली आहे.


हि कारवाई  24 ऑगस्ट 2022 रोजी सापळा अधिकारी प्रशांत संपते , पोलीस उप अधीक्षक,ला.प्र. वि. उस्मानाबाद ,  सापळा पथक - पोलीस अंमलदार दिनकर उगलमूगले,विष्णू बेळे , विशाल डोके, जाकेर काझी यांनी केली आहे.


उस्मानाबाद जिल्ह्यातील कोणी लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र. वि. उस्मानाबाद
मो.नं. 9527943100
श्री अशोक हुलगे,पोलीस निरीक्षक,
ला.प्र. वि. उस्मानाबाद
मो.नं.8652433397
विकास राठोड,पोलीस निरीक्षक,
ला.प्र. वि. उस्मानाबाद
मो.नं. 7719058567
कार्यालय 02472 222879


'उस्मानाबाद न्यूज' फेसबुक पेज वेबसाईट युट्युब वर बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क - 9665026996

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top