यावेळी विभागाचा आढावा घेत नुकसानीचे पंचनामे करुन तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. बैठकीत लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या अडचणीवर तोडगा काढण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश दिले. यावेळी खा. प्रताप पाटील चिखलीकर, माजी मुख्यमंत्री आ. अशोक चव्हाण, आ. राम पाटील, आ. अमर राजूरकर, आ. बालाजी कल्याणकर, आ. राजेश पवार, आ. मेघना बोर्डे, आ. डॉ. तुषार राठोड, जिल्हाधिकारी खुषालसिंह परदेशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, कृषी विभागाचे सहसंचालक दिवेकर, सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. तसेच इतर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी नांदेड येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली
ऑगस्ट २१, २०२२
0
नांदेड ;- यंदा अतिवृष्टीमुळे विदर्भ आणि मराठवाड्यात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचा कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत.दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विभागाची आढावा बैठक घेतली.
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा