उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश
आज नवरात्रीच्या सुरुवातीस प्रथम दिनी महाराष्ट्राची कुस्वामिनी श्री. आई तुळजाभवानीच्या कृपा आशिर्वादाने तसेच आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर श्रध्दा ठेवून तसेच सन्माननिय श्री. उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जिल्हा भरातील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी मातोश्री निवासस्थानी जावून सन्माननिय उध्दवजी ठाकरे साहेब यांच्याकडून शिवबंधन बांधून शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला.
याप्रसंगी उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह मातोश्री निवास्थानी शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीत उस्मानाबाद जिल्हा परिषद माजी सदस्य श्री. दीपक जवळगे, पंचायत समिती सदस्य तथा माजी उपसभापती श्री. शाम भैय्या जाधव, नगरसेवक तथा सभापती श्री. प्रदीप उर्फ पिंटू घोणे, नगरसेवक तथा गटनेते श्री. गणेश खोचरे, श्री. पंकज पडवळ, श्री. नाना घाडगे, श्री. महेश काटे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
यासमयी कार्यकत्यांशी संबोधन करताना नवरात्रीच्या शुभमुहुर्तावर आपण पक्षप्रवेश केला त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करुन शिवसेना पक्ष अडचणीतून मार्ग संक्रमण करत असताना आपण पक्षात प्रवेश केला हाच माझ्यासाठी तुळजाभवानीचा आशिर्वाद आहे आई तुळजाभवनीचा आशिर्वाद असताना कितीही अफजलखान आले तरी मला त्याची परवा नाही तसेच न्यायालयातील पक्षाच्या सुनावणीवर भाष्य करत असताना न्यायालयावर विश्वास असून तुळजाभवानीच्या आशिर्वादाने सर्व काही ठिक होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. पक्षप्रमुख या नात्याने आपणा सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल असे उद्गार श्री. उध्दवजी ठाकरे साहेब यांनी यावेळी काढले.
याप्रसंगी जिल्ह्याचे खासदार श्री. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, कळंब-धाराशिव विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. कैलास दादा घाडगे-पाटील, उस्मानाबाद नगरीचे माजी नगराध्यक्ष श्री. मकरंद ऊर्फ नंदुभैय्या राजेनिंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.


