उस्मानाबाद,दि.27(जिमाका):- जिल्हा परिषद स्वसंपादीत उत्पन्नातील पाच टक्के अपंग सेस योजनेंतर्गत 2022-2023 या आर्थिक वर्षाकरिता समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांग खेळाडूंना अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ज्या दिव्यांग लाभार्थींना या योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे, त्यांनी विहीत नमुन्यातील परीपूर्ण प्रस्ताव जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे दि.05 ऑक्टोबर 2022 पर्यंत पाठवून द्यावेत, असे आवाहन जि.प.चे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.


