नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत अर्ज करण्यासाठी ३० सप्टेंबर अंतिम मुदत
उस्मानाबाद,दि.28(जिमाका):- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी फळबाग लागवड, बांबू लागवड आणि वृक्ष लागवड या घटकासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2022 पर्यंत आहे.
तरी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी विहीत मुदतीत अर्ज करावे आणि 30 ऑक्टोबर 2022 पर्यंत लागवड अंतिम करणे बंधनकारक आहे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी यांनी केले आहे.


