google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 खाजगी पशुवैद्यकांच्या शिफारशीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

खाजगी पशुवैद्यकांच्या शिफारशीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

0

खाजगी पशुवैद्यकांच्या शिफारशीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

उस्मानाबाद,दि.11(जिमाका):- शासन निर्णयानुसार प्रधान सचिव (पदुम) यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समिती मार्फत पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी ही किमान शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या तसेच महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषदेकडील वैद्य नोंदणी प्रमाणपत्र धारण करणाऱ्या खाजगी पशुवैद्यकांकडून राज्यातील अपेडा अथवा तत्सम प्राधिकरणाकडून मान्यता प्राप्त कत्तलखान्यामध्ये महाराष्ट्र प्राणी रक्षण कायदा सुधारणा (1995) मधील तरतुदीनुसार कत्तलपूर्व तपासणी करिता शिफारस करण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे.

इच्छुक उमेदवारांनी भरावयाचा अर्ज, कामाचे स्वरुप, शैक्षणिक अर्हता, अनुभव, अर्जाचा विहित नमुना, अर्ज करण्याची पध्दती, आवश्यक पात्रता, अपेडा मान्यताप्राप्त कत्तल खान्याची यादी आदी बाबतची सविस्तर माहिती सर्व जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच या बाबतची माहिती पशुसंवर्धन विभागाच्या cah.diseasecontrol@gmail.com या ई-मेल आयडीवर संपर्क साधल्यास उपलबध करुन देण्यात येईल.

इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता, अनुभव आदी बाबतच्या स्वस्वाक्षरीत प्रमाणपत्रासह अर्ज अपेडा मान्यता प्राप्त कत्तल खान्यास नियुक्तीच्या प्राधान्यक्रमासह कार्यालयीन वेळेत खालील पत्त्यावर सादर करावेत. उमेदवारांनी हार्ड कॉपी (Hard Copy) मध्ये सादर केलेले अर्जच विचारात घेतले जातील. ई-मेल किंवा तत्सम माध्यमांद्वारे सादर केलेले अर्ज ग्राह्य धारले जाणार नाहीत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top