वाचन प्रेरणा दिन शिंगोली आश्रम शाळेत उत्साहात साजरा

0

Osmanabad | डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन शिगोली आश्रम शाळेत उत्साहात साजरा. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कुमंत शिंदे, प्रमुख पाहुणे श्री शेख अब्बास अली पर्यवेक्षक यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. श्री दीपक खबोले मेसाई जवळगेकर यांनी कलाम यांच्या जीवन चरित्राची माहिती दिली. मिसाईल मॅन म्हणून त्यांची ओळख संपूर्ण विश्वात आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य केले पाहिजे असे मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमासाठी श्री जाधव चंद्रकांत, श्री बर्दापुरे सूर्यकांत, श्री राठोड प्रशांत, श्री कैलास शानिमे, श्री सतीश कुंभार, श्री मदन कुमार अहमदापुरे, श्रीमती व्यवहारे, श्रीमती कांबळे, श्रीमती तोगरगे व कर्मचारी श्री गोविंद बनसोडे, श्री रेवा चव्हाण, श्री वसंत भिसे, श्री रामलिंग आडे इत्यादी कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री पडवळ.के.आर. उपळेकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन श्री पाटील रत्नाकर बाबुराव हिप्परगेकर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top