शिपाई पदाच्या भरतीसाठी दरपत्रक सादर करण्याचे आवाहन
उस्मानाबाद,दि.21(जिमाका):- नग
त्यास अनुसरून मान्यताप्राप्त संस्था, कंपनी यांच्याकडून या कार्यालयास दोन उमेदवार वर्ग -4 शिपाई पदासाठी जाहीर प्रसिध्दीकरण आणि बातमी देण्यात आली होती. यामध्ये या कार्यालयास दोन शिपाई पदाची आवश्यकता आहे, असे नजर चुकीने झाले आहे. परंतू एकाच शिपाई पदाची आवश्यकता आहे. (वर्ग-4 शिपाई पदासाठी किमान चौथी पास असणे आवश्यक आहे.) उमेदवाराची सेवा निव्वळ तात्पुरत्या कंत्राटी स्वरूपात 11 महिन्याच्या कालावधीसाठी उपलब्ध करून देण्यासाठी दरपत्रक मागविण्यात येत आहेत. दरपत्रके सिलबंद पाकीटात बातमी प्रसिध्द झाल्यापासून दि. 31 ऑक्टोंबर, 2022 रोजीचे सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत या कार्यालयाकडे पोहचतील अशा बेताने पाठविण्यात यावेत, तसेच अटी आणि शर्ती या कार्यालयाच्या सूचना फलकावर पहावयास मिळतील. कार्यालयाचा पत्ता सहायक संचालक, नगर रचना, उस्मानाबाद शाखा कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळ मजला रूम. नं 04 उस्मानाबाद- 413501 आहे. असे आवाहन नगर रचनाचे सहायक संचालक म.मा.केंद्रे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.