उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी विशेष मोहिमेदरम्यान जिल्हा भरात २७ छापे

0



 उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी विशेष मोहिमेदरम्यान जिल्हा भरात २७ छापे

 

मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन काल बुधवार दि. 19.10.2022 रोजी अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान 27 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला गावठी दारु निर्मीतीचा सुमारे 1,200 लि. द्रवपदार्थ नाशवंत असल्याने तो जागीच ओतून नष्ट करण्यात आला तर 609 लि. गावठी दारु व देशी- विदेशी दारुच्या एकुण 303 बाटल्या असे मद्य जप्त करुन एका गुन्ह्यातील मद्य वाहतुकीसाठी वापरलेली मोटारसायकलही जप्त करण्यात आली. ओतून दिलेला मद्यार्क निर्मीतीचा द्रवपदार्थ व जप्त दारु यांची एकत्रीत किंमत 1,30,617 ₹ आहे. यावरुन 29 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 27 गुन्हे खालीलप्रमाणे दाखल करण्यात आले आहेत.

1) ढोकी पो.ठा. च्या पथकाने पारधी पिढी, तेर येथे गावठी दारु निर्मीतीच्या दोन अड्ड्यावर छापे टाकले. यात पारधि पिडीवरील- गोरख पवार व राजा पवार हे दोघे 15.40 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीत 600 लि. द्रव पदार्थ व 110 लि. गावठी दारु बाळगलेले, तर  पिढीवरील चंदर काळे, रेखा काळे हे दोघे 16.00 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रणाचा 600 लि. द्रव पदार्थ व 200 लि. गावठी दारु बाळगलेले असताना पथकास आढळले.

2) उस्मानाबाद ग्रामीण पो.ठा. च्या पथकाने अंबेजवळगा येथे 17.00 वा. सु. छापा टाकला असता तेथे तांबेवाडी ग्रामस्थ- बाबासाहेब जाधव हे मोटारसायकल क्र. एम.एच. 13 बीडी 3622 वरुन 20 लि. गावठी दारु वाहून नेत असल्याचे पथकास आढळले.

3) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेंबळी पो.ठा. हद्दीतील कामगाव शिवारातील मधुराई हॉटेलजवळ 14.30 वा.सु. छापा टाकला असता तेथे बेंबळी ग्रामस्थ- अब्बास कोतवाल हे देशी दारुच्या 75 सिलबंद बाटल्या बाळगलेले आढळले. तर उमरगा पो.ठा. हद्दीतील कदेर शिवारात 15.00 वा. सु. छापा टाकला असता कदेर तांडा ग्रामस्थ- नामदेव आडे हे बंजारा हॉटेलमागे देशी दारुच्या 62 सिलबंद बाटल्या बाळगलेले असताना आढळले.

4) अंबी पो.ठा. च्या पथकाने तीन ठिकाणी छापे टाकले. यात सोनारी ग्रामस्थ- तुकाराम ईटकर हे 17.15 वा. सु. गावातील एका हॉटेलजवळ 09 लि. गावठी दारु बाळगलेले, तर परंडा येथील- देविदास डुकळे हे 16.00 वा. सु. उंडेगावातील एका हॉटेलजवळ देशी दारुच्या 18 सिलबंद बाटल्या बाळगलेले, तर देवगाव येथील- मुरला काकडे हे 18.00 वा. सु. गावातील समाज मंदीरासमोर देशी दारुच्या 15 सिलबंद बाटल्या बाळगलेले असताना आढळले.

5) उमरगा पो.ठा. च्या पथकाने दोन ठिकाणी छापे टाकले. यात गुंजोटी येथील- किशोर पुरी हे 14.04 वा. सु. गावातील एका शेडसमोर 40 लि. गावठी दारु बाळगलेले, तर तुरोरी येथील- रत्नाबाई धोत्रे हे 15.30 वा. सु. आपल्या घरासमोर 20 लि. गावठी दारु बाळगलेले असताना आढळले.

6) मुरुम पो.ठा. च्या पथकाने तीन ठिकाणी छापे टाकले. यात मुरुम येथील-  सिद्राम बनसोडे हे 10.30 वा. सु. गावातील बस स्थानकाजवळ 20 लि. गावठी दारु बाळगलेले, तर चिंचोली (भु.) येथील- महादेव सुरवसे हे 20.20 वा. सु. आपल्या घरासमोर 17 लि. गावठी दारु बाळगलेले, तर नाईकनगर तांडा, मुरुम येथील- अर्जुन पवार हे 19.40 वा. सु. आपल्या घरासमोर 19 लि. गावठी दारु बाळगलेले असताना आढळले.

7) उस्मानाबाद (श.) पो.ठा. च्या पथकाने दोन ठिकाणी छापे टाकले. यात बोंबले हनुमान परिसरातील- निलावती काळे या 18.45 वा.सु. आपल्या राहत्या परिसरात 14 लि. गावठी दारु बाळगलेल्या, तर बौध्दनगर येथील- अशोक धावारे हे 21.33 वा.सु. राहत्या परिसरात 19 लि. गावठी दारु बाळगलेले असताना आढळले.

8) तामलवडी पो.ठा. च्या पथकाने दोन ठिकाणी छापे टाकले. यात सांगवीकाटी येथील- तोळाबाई शिंदे या 16.00 वा. सु. गावातील एका ढाब्याजवळ 18 लि. गावठी दारु बाळगलेल्या, तर गोंधळवाडी येथील- दयानंद मोटे हे 19.50 वा. सु. आपल्या घरामागे देशी दारुच्या 11 सिलबंद बाटल्या बाळगलेले असताना आढळले.

9) भुम पो.ठा. च्या पथकाने दोन ठिकाणी छापे टाकले. यात पारधी पिढी, भुम येथील- कविता काळे या 19.10 वा.सु. आपल्या घरासमोर 18 लि. गावठी दारु बाळगलेल्या, तर वालवड येथील- पांडुरंग खराडे हे 17.30 वा.सु. गावातील जनावरांच्या बाजार मैदानाजवळ देशी दारुच्या 11 सिलबंद बाटल्या बाळगलेले असताना आढळले.

10) नळदुर्ग पो.ठा. च्या पथकाने इटकळ शिवारात 20.30 वा. सु. छापा टाकला असता बाभळगाव, ता. तुळजापूर येथील- पांडुरंग कांबळे हे तुळजापूर रस्त्यालगत एका शेडजवळ 30 लि. गावठी दारु बाळगलेले असताना आढळले.

11) कळंब पो.ठा. च्या पथकाने कन्हेरवाडी येथे 16.15 वा. सु. छापा टाकला असता ग्रामस्थ- दशरथ काळे हे आपल्या घरासमोर 10 लि. गावठी दारु बाळगलेले असताना आढळले.

12) परंडा पो.ठा. च्या पथकाने जवळा येथील ईडा रस्त्यालगत 17.20 वा. सु. छापा टाकला असता भिवराबाई राउत या देशी दारुच्या 46 सिलबंद बाटल्या बाळगलेल्या असताना आढळल्या.

13) लोहारा पो.ठा. च्या पथकाने सालेगाव शिवारात 19.45 वा. सु. छापा टाकला असता ग्रामस्थ- महावीर भालेराव हे आपल्या शेतातील हॉटेजवळ देशी दारुच्या 10 सिलबंद बाटल्या बाळगलेले असताना आढळले.

14) तुळजापूर पो.ठा. च्या पथकाने तुळजापूर येथील लातुर रस्त्यालगतच्या धान्य गुदामाजवळ 20.20 वा. सु. छापा टाकला असता मोर्डा, ता. तुळजापूर येथील- हिरामणी भोसले हे देशी दारुच्या 48 सिलबंद बाटल्या बाळगलेले असताना आढळले.

15) शिराढोन पो.ठा. च्या पथकाने देवधारोरा गावात 20.35 वा. सु. छापा टाकला असता ग्रामस्थ- नानासाहेब वाघमारे हे आपल्या घरासमोर 05 लि. गावठी दारु बाळगलेले असताना आढळले.

16) बेंबळी पो.ठा. च्या पथकाने लोसोना शिवारात 18.05 वा. सु. छापा टाकला असता घुगी ग्रामस्थ- गोपीनाथ सुरवसे हे लासोना येथील लकी हॉटेलमागे विदेशी दारुच्या 07 सिलबंद बाटल्या बाळगलेले असताना आढळले.

17) आनंदनगर पो.ठा. च्या पथकाने उस्मानाबाद शहरातील शिवछत्रपतीनगर येथे 19.30 वा. सु. छापा टाकला असता ग्रामस्थ- रतन काळे हे राहत्या परिसरात 40 लि. गावठी दारु बाळगलेले असताना आढळले.

(पारधी पिढी, तेर येथील गावठी दारु अड्ड्यावरील छाप्याची छायाचित्रे.)

                                               

                          

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top