google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 हॉटेल प्रताप व्हेज अँड नॉनव्हेजने ग्राहकाच्या जिभेची चोचले पुरवावेत-डॉ.प्रतापसिंह पाटील

हॉटेल प्रताप व्हेज अँड नॉनव्हेजने ग्राहकाच्या जिभेची चोचले पुरवावेत-डॉ.प्रतापसिंह पाटील

0

हॉटेल प्रताप व्हेज अँड नॉनव्हेजने ग्राहकाच्या जिभेची चोचले पुरवावेत-डॉ.प्रतापसिंह पाटील

भूम प्रतिनिधी-हॉटेल प्रताप व्हेज अँड नॉनव्हेज या नवीन सुरू होत असलेल्या हॉटेलच्या माध्यमातून भूम परिसरातील खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी हे हॉटेल उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी हॉटेल प्रताप व्हेज अँड नॉनव्हेजच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना व्यक्त केले.

 यावेळी युवासेना नेते रणजीत ज्ञानेश्वर पाटील, सपना पाव भाजी सेंटर पुणेचे रमेश अगावणे,युवा नेते साहिल गाढवे,कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव दत्तात्रय वाघ,सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक महादेव कवाळे सर,युवा सेनेचे जिल्हा सरचिटणीस ॲड.महेश आखाडे,तेरखेडा येथील उद्योजक व वैद्यकीय मदत कक्षाचे वाशी तालुका प्रमुख विकी चव्हाण,युवासेना तालुकाप्रमुख सुधीर ढगे,शिराळाचे सरपंच रेवन ढोरे,उद्योजक पांडुरंग घुले,दैनिक लोकमतचे संतोष वीर,  सरपंच अतुल शेळके,पवार साहेब  भैय्या कोळेकर,अक्षय खवले,मनसेचे तालुका सचिव अविनाश ढगे,जय हनुमान ग्रुपचे भूम तालुका अध्यक्ष अजय शेंडगे,सामाजिक कार्यकर्ते अक्की बर्वे,विधीज्ञ सिराज मोगल,फैजान शेख,दत्तात्रय घावटे,प्रा.सचिन ढगे ॲड.पंडित ढगे,ॲड.संदीप ढगे पाटील,तानाजी ढगे,प्रगतशील शेतकरी अजित ढगे,तानाजी विधाते,प्रगतशील शेतकरी बाळासाहेब ढगे

 यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

पुढे बोलताना डॉ. प्रतापसिंह पाटील म्हणाले की,  तीन वर्षापूर्वी प्रताप चायनीजच्या स्वरूपात सुरू झालेला हा प्रवास हॉटेलमध्ये परिवर्तित झालेला आहे. भविष्यात या हॉटेलचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रभर व्हावा अशा शुभेच्छा ही त्यांनी यावेळी बोलताना दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश नरळे यांनी केले तर आभार समाधान मातने यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिलीप शिंदे,प्रताप शिंदे  सुरेश यादव,सुनील शिंदे, सौरभ शिंदे प्रवीण शिंदे धीरज यादव तुषार मातने,अथर्व मातने यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top