google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 उस्मानाबाद शहरातील शेकडो तरुणांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

उस्मानाबाद शहरातील शेकडो तरुणांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

0


उस्मानाबाद शहरातील शेकडो तरुणांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

           Osmanabad :  हिंदुह्दयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि युवासेना प्रमुख आदीत्यजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन, उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकरजी यांच्या नेतृत्वास मान्य करुन धाराशिव शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास घाडगे पाटील व माजी नगराध्यक्ष नंदू राजेनिंबाळकर यांच्या प्रमुख हस्ते शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.


       शहरातील सरफराज उर्फ नविद काझी यांच्यासह त्यांच्या नेतृत्वाखाली शहरातील जिशान काझी, शाहबाज पठाण, सुलतान नाईकवाडी, जमशेर पठाण, जाकेर शेख, जावेद बेग, शाहाबाज कुरेशी, आतिक शेख, सदाम शेख, रेहान शेख, परवेज मोमीन, तोफिक शेख, आमेर तांबोळा, शहानुर मोमीन, समीर सय्यद, सहेबाज शेख, फसी काझी, बिलाल काझी, अनवर पठाण, यशवंत चव्हाण, खलील सौदागर, निहाल मुलानी, साजीद शेख, नुर बागवान, मजहर पठाण, जाकीर मोमीन, रफिक बागवान, आय्युब बागवान, ताहेर बागवान, निजाम शेख, अजर बागवान, बहु शेख, हैदर शेख, मुन्ना तांबोळी, रामा पेठे, सतिश पेठे, महेश पेठे, नुर तांबोळी, वहीम तांबोळी, दादा नवले, बबलु बागवान, जलील शेख, उमर बागवान, मेघराज शेटे, राजू शेख, फरदीन शेख, खंडु देडे, इस्माईल शेख, सनीत पेठे, इम्रान पठाण, आमीर पठाण, राहेशा पठाण, मोहसीन पठाण यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांच्या हाती जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास घाडगे पाटील आणि नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदु राजेनिंबाळकर यांनी  शिवबंधन बांधून यापुढील सामाजीक आणि राजकीय वाटचालीस मन:पुर्वक शुभेच्छा दिल्या.

          नुकत्याच झालेल्या दसरा मेळाव्यानंतर शिवसेना पक्षात होणारे प्रवेश म्हणजे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वावर जनतेचा आणि तळागाळातील सामान्य लोकांच्या वाढणारे प्रवेश म्हणजे लोकांचे आदरणीय उद्धवसाहेबांवर असणाऱ्या विश्वासाचे प्रतिक आहे असे आमदार श्री.कैलास घाडगे पाटील यांनी सांगितले.

          याप्रसंगी पंकज पाटील, मुजीब काझी, अफरोज पिरजादे, कलीम कुरेशी, गफुर शेख, बापु साळुंके, छोटा साजीद यांच्यासह जिल्हा शिवसेनेचे पदाधीकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top