google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 वाकडी केज येथील शिवसेनेच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि शेकडो कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश

वाकडी केज येथील शिवसेनेच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि शेकडो कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश

0


उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील वाकडी केज येथील ठाकरे गटाचे सरपंचउपसरपंचसदस्य आणि शेकडो कार्यकर्त्यांनी पक्ष नेतृत्वावर आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

पक्षात प्रवेश करणाऱ्यांमध्ये सरपंच श्रीमती परिमला अंबादास शिंदेउपसरपंच श्री.तुकाराम अंबादास कोल्हेसदस्य श्री.राहुल दिलीप रणदिवेश्रीमती रत्नामाला सुरेश यादवश्रीमती मंगल बाबुराव डुकरेश्री.हनुमंत वैजिनाथ शिंदेश्रीमती कविता सुरेश शिंदेश्री.गणेश बाळासाहेब कोल्हेश्री.संजय ज्ञानोबा फाटे श्री.हनुमंत कोल्हेश्री.अंबादास कोल्हेश्री.दिलीप रणदिवेश्री.भगवानराव यादवश्री.सुरेश यादवश्री.चंद्रकांत फाटेश्री.परमेश्वर कोल्हेश्री.फुलचंद कोल्हेश्री.राजभाऊ पुरीश्री.अमोल वाघमारेश्री.आबासाहेब रणदिवेश्री.सुरेश शिंदेश्री.समाधान कोल्हेश्री.चंद्रकांत जाधवश्री.अनंत रणदिवेश्रीपती साळुंके आदींचा समावेश आहे.

स्थानिक विकासाच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा हा सगळ्यांनी घेतलेला निर्णय अतिशय कौतुकास्पद आहे. हा निर्णय सर्वसामान्यांच्या हितासाठी सकारात्मक ठरेल. आता आपले सरकार असून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आपली सर्वांची जबाबदारी वाढली आहे. जिल्ह्यातील नागरिकांना आपल्याकडून मोठ्या अपेक्षा आहेतयामुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ताकदीने काम करणे गरजेचे आहे.

सर्वसामान्यांचे हित व अडचण लक्षात घेऊन लोकहिताचे निर्णय घेऊन त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. यामुळे शिंदे-फडणवीस सरकार बद्दलची विश्वासार्हता वाढविणे हे आपले काम आहे. गावातील महावितरण संबंधी कामे लवकरच पूर्ण करण्यात येतील. असे आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी उपस्थित गावकऱ्यांना आश्वासन दिले. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा संयोजक श्री.नितीन पाटीलतालुकाध्यक्ष श्री.अजित पिंगळेकिसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री.संजय पाटीलश्री.पी.जी.तांबारेयुवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.राजसिंह राजेनिंबाळकरयुवा मोर्चा तालुकाध्यक्ष श्री.प्रशांत लोमटेश्री. राहुल लंगडे व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top