अविष्कार संशोधन प्रकल्प स्पर्धांना तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात उस्फुर्त प्रतिसाद

0

उस्मानाबाद(24) येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे रायगड यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय अंतर विद्यापीठ संशोधन स्पर्धांचे आयोजन महाविद्यालय स्तरावर नुकतेच तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये पार पडले. यामध्ये सर्व विभागातून 30  विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्प प्रतिकृती आणि भीती चित्र याचे अतिशय उत्कृष्टरित्या सादरीकरण केले. या स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना विभागीय पातळीवरील स्पर्धेसाठी परभणी येथे सहभाग नोंदविता येणार आहे. या स्पर्धेसाठी खास मानवता भाषा कला ,वाणिज्य व्यवस्थापन ,विधी विज्ञान, कृषी व पशुसंवर्धन, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, औषध निर्माण शास्त्र अशा सहा गटात या स्पर्धा घेण्यात आल्या .विद्यार्थ्यांच्या या प्रकल्पासाठी लोणेरे विद्यापीठ चे अविष्कार समन्वयक डॉ. संजय खोब्रागडे यांचे मार्गदर्शन लाभले . तसेच संस्था स्तरावर झालेले या स्पर्धेला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने , व्यवस्थापकीय समन्वय प्रा. गणेश भातलवंडे ,स्पर्धेचे महाविद्यालय समन्वयक डॉ. पवनकुमार पाईकराव ,विभाग प्रमुख डॉ. उषा वडणे ,सर्व विभागप्रमुख डॉ. सुशीलकुमार होळंबे ,प्रा. मनीषा वाकुरे ,प्रा.ए.ए.जगताप ,प्रा. रोहिणी टेकाळे यांचे मार्गदर्शन मिळाले.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने म्हणाले की समाजातील ज्या समस्या आहेत त्याचे अवलोकन करून त्यादृष्टीने विद्यार्थ्यांनी संशोधन केल्यास ते संशोधन अधिक लोकाभिमुख होऊन लोकांपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी समस्येंचा अभ्यास केला पाहिजे.
 या स्पर्धेमध्ये लोकेशन बेस्ड वर्क ट्रॅकिंग सिस्टीम ,ओसियन एनर्जी , ब्लड ऑक्सिजन हार्टरेट मॉनिटर ,स्किन हायपर पिगमेंटेशन अँड हर्बल ट्रीटमेंट, डिवाइस फोर सीड सोयींग, ट्रीटमेंट ऑफ ऑर्थोराइटिस अशा प्रकारच्या नवनवीन विषयाचे प्रकल्प घेऊन विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले, त्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी महाविद्यालय आपल्याला सर्वतोपरी संसाधने व इतर गोष्टीसाठी सहकार्य करील याची ग्वाही देतो ,असेही प्राचार्य डॉ. माने म्हणाले .या संशोधन प्रकल्प स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top