उस्मानाबाद प्रतिनिधी - सांगलीत लाचखोरी केलेल्या स्वाती शेंडेची उस्मानाबाद जिल्हा पुरवठा अधिकारी या (कार्यकारी) पदावरील पदस्थापना बेकायदेशीर असल्याने बिभीषण लोकरे यांनी जिल्हाधिकारी यांचे मार्फत मुख्य सचिव महाराष्ट्र शासन तसेच अपर मुख्य सचिव महसूल व वन विभाग तसेच पालकमंत्री तानाजी सावंत यांना तक्रार दिल्याने पाच हजाराची लाचखोरी करणाऱ्या स्वाती शेंडे यांचे धाबे दनानले आहेत.
सविस्तर माहिती अशी कि स्वाती शेंडे ह्या उपजिल्हाधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कार्यालय सांगली येथे कार्यरत असताना एका गरीब
व्यक्तीस कर्ज मंजुरीसाठी आवश्यक महामंडळाचे संपती पत्र देण्यासाठी पाच हजाराची लाच घेतले प्रकरणी लाचखोर स्वाती शेंड यांना अँटीकरप्शन ब्युरो सांगली
यांनी दिनांक ११/१२/ २०१९ रोजी रंगेहाथ पकडले होते त्या अनुषंगाने लाचखोर स्वाती संतोष शेंडे यांच्यावर विश्रामबाग पोलीस स्टेशन सांगली येथे गुन्हा नंबर
४७५/२०१९ दाखल झालेला आहे सदर प्रकरण मे. सुरेश प्रभाकर पौळ जिल्हा न्यायाधीश क्रमांक ५ अतिरिक्त सेशन जज सांगली यांच्या न्यायालयात स्पेशल
केस नंबर १९२/२०२१ दाखल असून मे. न्यायालयात अँटी करप्शन ब्युरो सांगली यांनी दोषारोप पत्र दाखल केले असून पुढील तारीख २०/ १२ /२०२२ रोजी
ठेवलेली आहे सदर प्रकरणी लाचखोर स्वाती शेंडे यांना शासनाने म.ना से शिस्त व अपील नियम १९७९ च्या नियम ४(१) (क) अन्वये प्रधान करण्यात आलेल्या
सक्तीचा वापर करून विभागीय चौकशी प्रस्तावित करून निलंबित केले होते.सदर लाचखोर निलंबित आरोपी स्वाती शेंडे यांनी मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांना
आर्थिक देवाण-घेवाण करून शासन निर्णय क्रमांक निप्रआ-११११ प्र.क्र. ८६/११ अ, दिनांक १४ ऑक्टोबर २०११ पायदळी तुडवून लाचखोर आरोपी स्वाती
शेंडे यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी उस्मानाबाद या (कार्यकारी) पदावर बेकायदेशीर नियुक्ती आदेश टिआरएफ-११२१/प्र.क्र.१६२/ई-२ दिनांक २१ जानेवारी
२०२२ अन्वये डॉ. माधव वीर शासनाचे सह सचिव मंत्रालय मुंबई यांच्या स्वाक्षरीने आदेश पारित केलेला असून लाचखोर आरोपी स्वाती शेंडे यांनी दिनांक
२४/१/२०२२ रोजी (कार्यकारी) पद जिल्हा पुरवठा अधिकारी उस्मानाबाद स्वीकारले आहे.
.
वास्तविक पाहता लाचखोर आरोपी स्वाती शेंडे सारख्या अधिकाऱ्याच्या शासन सेवेबाबत शासन निर्णय क्रमांक निप्रआ-११११ प्र.क्र. ८६/११ अ,
दिनांक१४ ऑक्टोबर २०११ रोजीच्या शासन निर्णयात स्वाती शेंडे सारख्या लाचखोर आरोपी अधिकाऱ्यांना ज्या ठिकाणी जनसंपर्क येणार नाही अशा (अकार्यकारी) पदावर पदस्थापना राहील असा शासन निर्णय असताना लाचखोर स्वाती शेंडे यांनी शासनाची दिशाभूल फसवणूक करून संगणमताने जिल्हा पुरवठा
अधिकारी उस्मानाबाद हे(कार्यकारी) पद मिळवलेले आहे असे तक्रारीत नमुद करून सदर लाचखोर आरोपी स्वाती शेंडे यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी उस्मानाबाद या कार्यकारी पदावर आल्यापासून उस्मानाबाद जिल्ह्याची मान शरमेने खाली गेली आहे तसेच लाचखोर स्वाती शेंडे सारख्या अधिकारीची वसुली जोमात उस्मानाबाद जिल्हा कोमात अशी परिस्थिती झाली आहे जिल्ह्यातील रेशनकार्डधारक, रेशनदुकानदार, पेट्रोलपंप चालकाकडून प्रचंड रोश व्यक्त होत आहे त्यामुळे सदर लाचखोर आरोपी स्वाती शेंडे यांची नियुक्ती आदेश बेकायदेशीर असून याची
उच्चस्तरीय चौकशी करून दोषीवर शासन सेवेतून बडतर्फ करण्याची कार्यवाही करावी व लाचखोर आरोपी स्वाती शेंडे यांनी शासनाकडून उचललेली पगार सक्तीने
बसूल करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी तक्रार दाखल केली आहे.