जिल्ह्यात सामाजिक न्याय पर्व निमित्त विविध कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन
उस्मानाबाद,दि.02(जिमाका):- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य् विभाग मार्फत दि. 26 नोव्हेंबर ते 06 डिसेंबर 2022 हा कालावधी सामाजिक न्यायपर्व म्हणून करण्यात येत आहे. विभागाचे सचिव, आयुक्त आणि प्रादेशिक उपायुक्त यांच्या मार्गदर्शनानुसार समतापर्व निमित्त विविध कार्यक्रमाचे, उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
त्यानुसार दि. 28 नोव्हेंबर 2022 रोजी श्रीपतराव भोसले हायस्कूल उस्मानाबाद येथे भारतीय संविधान या विषयावर व्याखानाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प्हार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले तसेच सर्व उपस्थित विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवर यांनी सामूहिक संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. उपस्थित रा.प.महाविद्यालयाचे सहा.प्राध्यापक नितीन गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यालयातील कार्यालय अधीक्षक गवळी एस.ए., भोसले वाय.एस. आणि चव्हाण वाय.एस. तसेच महाविद्यालयातील दोनशे विद्यार्थी आणि शिक्षक मोठया प्रमाणात सहभागी झाले होते. त्यानंतर राष्ट्रगीताचे गायन करुन भारतीय संविधान व्याख्यान मालेचा समारोप करण्यात आला.
दि. 29 नोव्हेंबर 2022 रोजी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय येथे सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा या विषयाव व्याखानाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प्हार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले आणि सर्व उपस्थित विद्यार्थी, शिक्षक तसेच मान्यवर यांनी सामूहिक संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. उपस्थित डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहाचे गृहपाल बी.ए.नाईकनवरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यालयातील भोसले वाय.एस. आणि चव्हाण वाय.एस तसेच महाविद्यालयातील दोनशे विद्यार्थी आणि शिक्षक मोठया प्रमाणात सहभागी झाले होते. त्यानंतर राष्ट्रगीताचे गायन करुन भारतीय संविधान व्याख्यान मालेचा समारोप करण्यात आला.
दि. 30 नोव्हेंबर 2022 रोजी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण येथे अनसूचित जाती उत्थान दशा आणि दिशा या विषयावर व्याखानाचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प्हार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच सर्व उपस्थितांनी सामूहिक संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. उपस्थितीत जिल्हा जात पडताळणी समितीचे उपायुक्त बलभिम शिंदे उपायुक्त यांच्या अद्यक्षतेखाली कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले. या कार्यशाळेस व्याख्याते म्हणून रा.प.महाविद्यालयाचे राज जगताप यांनी उपस्थितीत राहून आपले मनोगत व्यक्त केले. या कार्याशाळेत कार्यालयातील सर्व कर्मचारी, जिल्हा जात पडताळणी समिती सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चव्हाण वाय.एस यांनी केले. त्यानंतर राष्ट्रगीताचे गायन करुन भारतीय संविधान व्याख्यान मालेचा समारोप करण्यात आला.
दि. 01 डिसेंबर 2022 रोजी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण येथे अनसूचित जाती स्वयं सहाय्यता युवागटाची कार्यशाळा या विषयावर व्याखानाचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले तसेच सर्व उपस्थित मान्यवर यांनी सामूहिक संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. जिल्हा उद्योग केंद्राचे प्रकल्प अधिकारी पी.के.मोरे आणि समता दूतचे प्रकल्प अधिकारी तुषार कदम यांनी उपस्थितीत राहून आपले मनोगत व्यक्त केली. या कार्याशाळेत जिल्हयातील 100 ते 150 युवक आणि युवती उपस्थित होते. त्यानंतर राष्ट्रगीताचे गायन करुन भारतीय संविधान व्याख्यान मालेचा समारोप करण्यात आला.