अवैध मद्य विरोधी विशेष मोहिमेदरम्यान जिल्हा भरात १६ छापे
उस्मानाबाद : पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन काल बुधवार दि. 30.11.2022 रोजी अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान 16 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला गावठी दारु निर्मीतीचा सुमारे 5,540 लि. द्रवपदार्थ नाशवंत असल्याने तो जागीच ओतून नष्ट करण्यात आला तर सुमारे 898 लि. गावठी दारु, सुमारे 50 लि. ताडी हे अंमली द्रव व देशी- विदेशी दारुच्या एकुण 125 बाटल्या असे मद्य जप्त केले. ओतून दिलेला मद्यार्क निर्मीतीचा द्रवपदार्थ व जप्त मद्य यांची एकत्रीत किंमत अंदाजे 4,20,120 ₹ आहे. यावरुन 16 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 16 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.
1) उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने उस्मानाबाद शहर परिसरात 08.00 ते 11.30 वा. दरम्यान 10 ठिकाणी छापे टाकले. यात पारधी पिढी, उस्मानाबाद येथील- नगिना रवि काळे, संगिता रमेश पवार, रतनबाई रमेश पवार व मंगल संजय काळे या सर्वजणी आपापल्या राहत्या घरासमोर गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीत अंबवलेला एकुण सुमारे 5,200 लि. द्रव पदार्थ व एकुण सुमारे 370 लि. गावठी दारु बाळगलेल्या आढळल्या. तसेच इंदीरानगर, उस्मानाबाद येथील- मीनाबाई राम काळे, ज्योती राम चव्हाण व राजभाऊ माने हे सर्वजण आपापल्या राहत्या घरासमोर एकुण सुमारे 160 लि. गावठी दारु बाळगलेले, तर भिमनगर येथील- दिपक शेषेराव सोनवणे हे आपल्या घरासमोर 40 लि. गावठी दारु बाळगलेले, आगडगल्ली येथील- अमोल बापु शिंदे हे आपल्या घरासमोर 60 लि. गावठी दारु बाळगलेले तर देशपांडे स्टँड परिसरातील- अदित्य विठ्ठल यमपुरे हे आठवडी बाजार मैदानात 75 लि. गावठी दारु बाळगलेले असताना पथकास आढळले.
2) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 4 ठिकाणी छापे टाकले. यात उस्मानाबाद ग्रामीण पो.ठा. हद्दीत पारधी पिढी, वरुडा येथील- भारतबाई राजाभाउ पवार या पिढीवरील आपल्या घरासमोर गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीत अंबवलेला सुमारे 340 लि. द्रव पदार्थ व 08 लि. गावठी दारु बाळगलेल्या आढळल्या. तसेच उस्मानाबाद शहर पो.ठा. हद्दीत दुध डेअरी पारधी पिढी येथील- गणेश रतन काळे हे 85 लि. गावठी दारु बाळगलेले, आनंदनगर पो.ठा. हद्दीत सांजा झोपडपट्टी येथील- प्रल्हाद तुळशीराम काळे हे आपल्या घराजवळ 100 लि. गावठी दारु बाळगलेले, तर तुळजापूर पो.ठा. हद्दीत कात्री येथील- महेश किसनसिंग चव्हाण हे कात्री गावातील हनुमान मंदीरामागे देशी दारुच्या 110 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना पथकास आढळले.
3) येरमाळा पो.ठा. च्या पथकाने येरमाळा गावात छापा टाकला. यावेळी ग्रामस्थ- योगेश भारत बारकुल हे आपल्या राहत्या घरासमोर विदेशी दारुच्या 15 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना आढळले.
4) तुळजापूर पो.ठा. च्या पथकाने तुळजापूर तालुक्यातील शिराढोन गावात छापा टाकला. यावेळी ग्रामस्थ- विलास बब्रुवान रसाळ हे गावातील एका धान्य गुदामाच्या आवारात 50 लि. ताडी हे अंमली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना आढळले