२० वर्षीय मुलगीवर लैंगीक अत्याचार, गुन्हा दाखल
Osmanabad : एका गावातील एक 20 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) ही दि.27.12.2022 रोजी 13.00 वा.सु.गाईला पाणी पाजण्यासाठी ओढ्यावर गेली होती.यावेळी गावातील एका तरुणाने तिला उसाचे पिकात नेवून तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. तसेच दि.28.12.2022 रोजी 14.00 वा.सु.पहिल्या तरूणासह अन्य पाच तरूणाने तीला चाकुचा धाक दाखवून तिच्यावर पुन्हा लैंगीक अत्याचार केला. या दरम्यान त्यांच्यातील एका तरूणाने सदर घटनेचे मोबाईलवर छायाचित्रण करून प्रसारीत केले.अशा मजकुराच्या पिडीतीने दि.29.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं.कलम-376,376(ड),506,34 सह ITact कलम 67 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. अशी माहिती उस्मानाबाद पोलीस माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.