राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक सुशोभीकरणासाठी 50 लाखाचा निधी मंजूर
उस्मानाबाद : शहरातील राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक सुशोभीकरणासाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
ओबीसी जनमोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन शेंडगे यांनी आ.गोपीचंद पडवळकर यांच्याकडे राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकासाठी सुशोभीकरण निधीची मागणी केली होती आ.गोपीचंद पडवळकर यांनी यांची दखल घेऊन सुशोभीकरण करण्यासाठी वैशिष्ट्यपुर्ण योजनेअंतर्गत 50 लाखाचा निधी मंजूर केला आहे. या कामात सचिन शेंडगे यांना बीड जिल्ह्यातील परळीतील धनगर समाजाचे नेते शिवदास बिडगर यांची मोलाची मदत मिळाली ची माहिती शेंडगे यांनी दिली.
नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेअंतर्गत अनुदान देण्यात येते याच योजनेतून उस्मानाबाद नगरपरिषद करिता 50 लाख रुपयांचा निधी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक सुशोभीकरणासाठी मंजूर झाला आहे यात शंभर टक्के निधी राज्य शासनाचा आहे.
यामुळे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चौकासाठी मिळलेला निधीतून लवकरच सुशोभीकरण होणार आहे त्यामुळे धनगर समाजाच्या वतीने आ.गोपीचंद पडवळकर यांचे आभार मानले जात आहेत तसेच ओबीसी जनमोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन शेंडगे यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकासाठी सातत्याने पाठपुरावा करून निधी मंजूर केल्याबद्दल समाजाच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला असून आ.गोपीचंद पडवळकर यांचे आभार मानण्यासाठी जिल्ह्यातील समाज बांधव लवकरच भेट घेणार याची माहिती शेंडगे यांनी दिली आहे.