वरुडा ग्रामपंचायत मध्ये गाव आढावा बैठक संपन्न

0




वरुडा ग्रामपंचायत मध्ये गाव आढावा बैठक संपन्न

उस्मानाबाद : तालुक्यातील वरुडा येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शासकीय निमशासकीय अधिकाऱ्यांची गाव पातळीवर बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीमध्ये शासकीय योजनेविषयी गावकऱ्यांना  मार्गदर्शक करून गावकऱ्यांनी या योजनेचे लाभ घ्यावे असे आवाहन करण्यात आले तसेच गावातील ग्रामस्थांनी अडचणी अधिकाऱ्यासमोर मांडल्या गावातील सर्व नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर तात्काळ उपयोजना करण्यात येतील असे आश्वासन ग्रामस्थांना देण्यात आले आहे. 



 या बैठकीला गावचे सरपंच मीरा गाढवे, उपसरपंच वैशाली गंगावणे, सचिन शेंडगे, प्रशांत पाटील भाऊ पवार माणकेश्वर गाढवे, लखन  गाढवे यासह या बैठकीची प्रास्ताविक पद्माकर गाढवे  यांनी केले तर आभार सुनील शेंडगे यांनी मानले या बैठकीला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top