आम्ही त्या दुःखातून सावरलो नाही असे म्हणत उडविलेल्या खिल्लीचे शिंदे गटात गेलेल्या शिवसैनिकांकडून उत्तर!
उस्मानाबाद : 15 जानेवारी रोजी पिकविमा संदर्भात खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आमदार कैलास पाटील माजी नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी पत्रकारांनी प्रश्न विचारला होता निष्ठावंत शिवसैनिक शिवसेना सोडून जात आहेत व काही दिवसापूर्वीच शहराध्यक्ष पप्पू मुंडे यांनी यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावर खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर म्हणाले होते अख्य महाराष्ट्र शिंदे गटात प्रवेश करत आहे सगळ्यांना माहीतच आहे काय कारण त्याच वेळी माजी नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी खासदारांना शांत बसवत बोलण्यास सुरुवात केली आम्ही या 'दुःखातून अजून सावरलो नाहीत' असे म्हणतच खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील व माजी नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर हे तिघानिही हसण्यास सुरुवात केली. यावरून प्रसारमाध्यमांनी त्याच्या बातम्या प्रकाशित केल्या होत्या त्याचेच उत्तर देत शिंदे गटात गेलेल्या कार्यकर्त्यांनी एक प्रेस नोट काढली आहे व त्यामुळे आमदार , खासदार , माजी नगराध्यक्ष यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
शिंदे गटातून काढलेली प्रेस नोट खालील प्रमाणे
टक्केवारी,दलाली व भ्रष्टाचाराच्या माध्यमातून जनतेची लूट करणाऱ्या खासदार, आमदार व माजी नगराध्यक्ष यांनी आम्हा शिवसैनिकांची खिल्ली उडवल्याच सोशल मीडिया द्वारे माहीत झालं. सत्तेचा मलिदा खायला मिळावा यासाठी ज्यांनी जिल्ह्यातील जवळपास सर्वच पक्षाच्या नेत्यांचे पाय चाटायला कमी केलं नाही त्या बोगस लोकांना आमच्यावर बोलण्याचा अधिकार तर आहे का.?
आमच्या जीवावर खासदार, आमदार व नगराध्यक्षपद मिळवलं आणि आता आम्हा शिवसैनिकांची खिल्ली उडवायला लाज वाटत नाही का तुम्हाला. जस कळते झालो तेंव्हापासून आम्ही बाळासाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करत आहोत. गेल्या 30 वर्षात कुठल्याही फळाची अपेक्षा केली नाही.तुमच्या सारखे सरकारी अधिकारी,गुत्तेदार यांच्याकडून आम्ही हफ्ते घेतले नाहीत.
मकरंद राजेनिंबाळकर तुम्ही धाराशिव नगर पालिकेच्या माध्यमातून केलेला भ्रष्टाचार आता लवकरच उघड होईल. तेंव्हा तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही.गेली पाच वर्ष शहराला जे बकाल रूप आलं आहे, धरणात पाणी असताना लोकांना वेळेवर पाणी मिळत नाही, गल्लोगल्लीचे रस्ते खराब झाले आहेत, शहरात धुळीचे लोट आहेत, नागरिकांना श्वास घेणे मुश्किल झाले आहे. त्याला सर्वस्वी तुम्ही केलेला भ्रष्ट व अनागोंदी कारभार जबाबदार आहे.शहराचा विकास केला म्हणणारे नंदुराजे निवडणूक लढवताना भाड्याच्या घरात राहत होते. शिवसैनिकाच्या जीवावर निवडून येऊन 4 कोटीचे घर आणि 50 लाखाची गाडी घेवून स्वतःचा विकास करणारे भ्रष्ट व अकार्यक्षम माजी नगराध्यक्ष यांनी आम्हा निष्ठावंत शिवसैनिकांवर टीका करू नये.
आमच्यासारख्या निष्ठावंत व प्रमाणिक शिवसैनिकांवर हसण्याची किंमत काय असते ते तुम्हाला येणाऱ्या निवडणूकीत दाखवून देऊ. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जे अपयश तुमच्या पदरी आलं आहे त्याला कारण आमच्या सारख्या निष्ठावंत शिवसैनिकांची तुम्ही केलेली गळचेपी आहे. स्वतःला शिवसैनिक म्हणायचे मात्र ज्यांचा शिवसेनेचा काडीचाही संबंध नाही अशा आपल्या बगलबच्चेना पद व लाभ मिळवून देण्याची तुमची वृत्ती शिवसेना संपवल्याशिवाय राहणार नाही.
सावंत साहेब मला नगराध्यक्ष करा तुमच्याकडे प्रवेश करतो असे बोलणारे लोक आमच्यावर टीका करतात हे हास्यास्पद आहे.जे मूळचे शिवसैनिक आहेत आज त्यांची काय अवस्था केली आहे हे सर्व जनतेला माहीत आहे आणि बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डिवचल्यावर त्याचे काय परिणाम होतात हे येणारा काळ तुम्हाला सांगेल. इथून पुढं जर आमच्यावर कांही टीका टिप्पणी केली तर याद राखा तुमच्या अब्रूची लक्तरे धाराशिवच्या वेशीवर टांगल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. असे मत संजय उर्फ (पप्पु) मुंडे , भीमा (आण्णा) जाधव यांनी प्रेस नोट द्वारे प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे.