शिवसेना उपशहर प्रमुख प्रशांत साळुंके यांचे कडून इफ्तार पार्टीचे आयोजन
उस्मानाबाद :
शिवसेनेचे उपशहर प्रमुख प्रशांत साळुंके यांनी बिलाल मस्जीद येथे इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते.
मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे.गेली १७ वर्षापासून प्रभागातील मुस्लिम बांधवांसाठी हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते. यावर्षी २२ एप्रिल रोजी पवित्र असा रमजान ईदचा सण साजरा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांकरीता प्रशांत साळुंके यांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. २० टक्के राजकारण आणि ८०% समाजकारण या बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेला वाहून घेतलेल्या प्रशांत साळुंके यांनी राजकारणाबरोबरच समाजकार्य ही महत्त्वाची आहे असे समजून अनेक वर्षापासून सर्व धर्मीय बांधवांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवतात.
प्रशांत साळुंके यांनी काकडे प्लॉट भागासह अन्य ठिकाणी वृक्षारोपणासाठी उपक्रम देखील राबवलेले आहेत. प्रभागात नवरात्र महोत्सव गणेशोत्सव विविध सामाजिक उपक्रम सर्वधर्मीयांकडून मोठ्या उत्सवात साजरे केले जातात.