नव्वद हजार रुपये लाच स्वीकारताना साहायक पोलीस निरीक्षकावर कारवाई!

0

नव्वद हजार रुपये लाच स्वीकारताना साहायक पोलीस निरीक्षकावर कारवाई!

Osmanabad : लाचेची मागणी रक्कम 5,00,000/-(पाच लाख रुपये ) किंवा सेकंड हॅन्ड गाडी व तडजोडीअंती रू. 90,000/-  यातील आलोसे क्र. 01. भगवान भरत नाईकवाडे, सहायक पोलीस निरीक्षक हे दहशतवादी विरोधी पथक, उस्मानाबाद येथे सन 2019 मध्ये नेमणूकीस असताना  त्यांनी वाशी येथे पत्त्याच्या क्लब वर रेड करून  त्यामध्ये यातील तक्रारदार व इतरांना आरोपी केले. तसेच त्याच दिवशी त्यांनी सदर जुगाराच्या गुन्ह्यातील व वाशी येथील ईतर लोकांविरुद्ध कलम 353, 307 चा गुन्हा दाखल केला. परंतु कलम 353,307 च्या गुन्ह्यामध्ये तक्रारदार यांचा सहभाग नसल्याने त्यांना आरोपी केले नव्हते. दिनांक 14.04.2023 रोजी यातील आलोसे क्र. 01 भगवान भरत नाईकवाडे, सहायक पोलिस निरीक्षक व क्र. 02 सागर वसंतराव कांबळे, पोलीस शिपाई यांनी तक्रारदार यांना सन 2019 मध्ये जुगाराच्या गुन्ह्यात मदत केली आणि कलम 353,307 मध्ये आरोपी केले नाही म्हणून रू 5,00,000/- (पाच लाख रुपये ) किंवा सेकंड हॅन्ड गाडी अश्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती रू 90,000/- (नव्वद हजार रुपये ) लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. परंतु यातील आलोसे यांना संशय आल्याने त्यांनी तक्रादार यांचेकडून लाच रक्कम स्वीकारली नाही. म्हणून सदर आलोसे क्र. 01 व 02 यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन परांडा, ज़िल्हा उस्मानाबाद  येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे. 

सापळा अधिकारी :- सिद्धाराम म्हेत्रे, पोलीस पोलीस उप अधीक्षक,  ला. प्र. वि. उस्मानाबाद मो. क्र.9594658686  मार्गदर्शक - मा. संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद.मो.न.9923023361 , मा. विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. औरंगाबाद. मो. न.8788644994  , सापळा पथक - पोलीस निरीक्षक विकास राठोड, पोलीस अमलदार  दिनकर उगलमोगले, मधुकर जाधव, अर्जुन मारकड, विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर, विशाल डोके.

लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा*
*कार्यालय 02472 222879*
टोल फ्री क्रमांक.1064

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top