उस्मानाबाद जिल्ह्यातील तीन ठिकाणी चोरी गुन्हे दाखल
मालमत्तेविरुध्द गुन्हे नोंद
तुळजापूर पोलीस ठाणे : तुळजाई नगर, तुळजापूर येथील- कल्याण तुकाराम तोडकरी यांची व शेजारी राहणारे संजय गलांडे या दोघांच्या दोन मोटरसायकल अंदाजे 60,000 ₹ किंमतीची 1) स्प्लेंडर मोटारसायकल क्र.एम.एच.25 एपी 9992, 2) होडां शाईन मोटरसायकल क्र एमएच 25 ए 8561 या दि.027.04.2023 रोजी 11.45 ते दि.28.04.2023 रोजी 06.00 वा. दरम्यान तुळजाईनगर तुळजापूर येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या कल्याण तोडकरी यांनी दि. 09.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
कळंब पोलीस ठाणे : तेर, ता. उस्मानाबाद येथील- चंदा ज्योतीराम शिंदे ह्या धारुर येथे जाण्यासाठी दि. 09.05.2023 रोजी 13.45 वा. दरम्याण कळंब बसस्थानक येथे कळंब ते केज बस मध्ये चढत असताना अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेऊन चंदा यांचे पर्स मधील अंदाजे 87,600 ₹ किंमतीचे सुवर्ण दागिणे त्यांचे नकळत चोरुन नेले. अशा मजकुराच्या चंदा शिंदे यांनी दि. 09.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा पोलीस ठाणे : माडज, ता. उमरगा येथील- गौरीशंकर शिवराजप्पा परमशेट्टी यांचे घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.08.05.2023 रोजी 11.30 ते 15.30 वा. दरम्यान तोडून घरात प्रवेश करुन कपाटातील लॉकर तोडून 19 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिणे अंदाजे 66,742 ₹ किंमतीचा माल चोरुन नेले. अशा मजकुराच्या गैरीशंकर परमशेट्टी यांनी दि. 09.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.