उस्मानाबाद पोलिसांची अवैध मद्य विरोधी व जुगार विरोधी कारवाई

0


उस्मानाबाद पोलिसांची अवैध मद्य विरोधी व जुगार विरोधी कारवाई


अवैध मद्य विरोधी कारवाई .

अवैध मद्य विरोधी कारवाई दरम्यान उस्मानाबाद पोलीसांनी दि.09.05.2023 रोजी जिल्हाभरात एकुण 9 कारवाया केल्या. यात घटनास्थळावर आढळलेली गावठी दारु निर्मीतीचे अंबवलेला द्रव पदार्थ हा नाशवंत असल्याने तो जागीच ओतून नष्ट करण्यात आला. व दारु 131 लि. व देशी- विदेशी 182 सिलबंद बाटल्या असे मद्य जप्त केले. त्या नाश केलेल्या द्रव पदार्थासह जप्त केलेल्या मद्याची एकुण अंदाजे 42,010 ₹ असून पोलीसांनी संबंधीत व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65 (ई) अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे खालील प्रमाणे गुन्हे नोंदवले आहेत.

1) कळंब एस. डी. पी. ओ. कार्यालयाच्या पथकास   पुर्नवसन सावरगाव, ता. कळंब येथील- मालन पवार, रेश्मा पवार, सविता पवार या तिघी 06.50 वा. सु. पुर्नवसन सावरगाव, ता. कळंब येथे गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीत अंबवलेला सुमारे 22,450 ₹ किंमतीचे द्रव पदार्थ अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेल्या, तर मार्केट यार्ड, कळंब येथील- आशाबाई पवार ह्या 07.45 वा. सु. मार्केट यार्ड कळंब येथे 15 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेल्या आढळल्या.

2)अंबी पोठाच्या पथकास आलेश्वर ता. परंडा येथील- बबन चव्हाण  हे 18.00 वा. सु. आपल्या राहत्या घरा समोर एकुण 9 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.

3)भुम पोठाच्या पथकास राळेसांगवी, ता. भुम येथील- सोमा जाधव हे 17.25 वा. सु. राळेसांगवी फाटा ते गावात जाणारे रोडलगत देशी दारुच्या एकुण 23 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.

4)ढोकी पोठाच्या पथकास कोंड, ता. उस्मानाबाद येथील- सिध्दार्थ जाधव हे 14.15 वा. सु. कोंड ते आंदोरा जाणारे रोडलगत  90 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.

5)उमरगा पोठाच्या पथकास धाकटीवाडी, ता. उमरगा येथील- शिवाजी सास्तुरे हे 21.40 वा. सु. जगदाळवाडी जाणारे रोडलगत  17 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले, तरनिलगुर तांडा, तुरोरी येथील- रोहीदास राठोड हे 20.00 वा. सु. निलगुर तांडा तुरोरी येथे देशी  विदेशी दारुच्या एकुण 10 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.

6)तामलवाडी पोठाच्या पथकास मसला खु, ता. तुळजापूर येथील- बाबुराव गायकवाड हे 20.45 वा. सु. आपले राहते घराच्या बाजूला देशी विदेशी दारुच्या 25 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.

7)उस्मानाबाद ग्रामीण पोठाच्या पथकास बावी, ता. उस्मानाबाद येथील- विकास उंडे हे 19.20 वा. सु. बावी येथे उंडे किराणा दुकाणा जवळ पत्रा शेडमध्ये येथे देशी विदेशी दारुच्या 124 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.

 

 जुगार विरोधी कारवाई.

 

लोहारा पोलीस ठाणे : जुगार विरोधी कारवाई दरम्यान लोहारा पोलीसांनी दि.09.05.2023 रोजी  13.30 वा. सु.लोहारा पो.ठा. हद्दीत  छापा टाकला यावेळी लोहारा येथील- बलभिम विरुध्दे हे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रोडवर कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 1,250 ₹ रक्कम बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत लोहारा पोठा येथे गुन्हा नोंदवला आहे

उमरगा पोलीस ठाणे : जुगार विरोधी कारवाई दरम्यान उमरगा पोलीसांनी दि.09.05.2023 रोजी 15.30 वा. सु.उमरगा पो.ठा. हद्दीत  छापा टाकला यावेळी कसगी, ता. उमरगा येथील- नागेंद्र गायकवाड हे कसगी येथे  कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 2,805 ₹ रक्कम बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत उमरगा पोठा येथे गुन्हा नोंदवला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top