जलसाठ्यामधून गाळ काढण्याची अंमलबजावणी अशासकीय संस्थेमार्फत करण्यात येणार इच्छुक अशासकीय संस्थेने १५ मे २०२३ पर्यंत आपले प्रस्ताव सादर करावेत

0

जलसाठ्यामधून गाळ काढण्याची अंमलबजावणी अशासकीय संस्थेमार्फत करण्यात येणार इच्छुक अशासकीय संस्थेने  15 मे 2023  पर्यंत आपले प्रस्ताव सादर करावेत

 

उस्मानाबाद,दि,09(जिमाका):- शासनाने राज्यातील जलसाठ्यामधील गाळ काढणे व तो शेतामध्ये वापरणे यासाठी मृद व जलसंधारण विभागाकडून “गाळ मुक्तधरण व गाळयुक्त शिवार” हि योजना कायमस्वरुपी राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे.या योजनेंअंतर्गत जलसाठ्यामधून गाळ काढण्याची अंमलबजावणी ही अशासकीय संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. या कामासाठी इच्छुक अशासकीय संस्थेने या कार्यालयास दि. 15 मे 2023 रोजी दुपारी 12.00 पर्यंत आपले प्रस्ताव सर्व कागदपत्रासोबत (प्रमाणपत्रासोबत) सादर करावे. या कामासाठी अशासकीय संस्था निवड करण्यासाठी  निकष शासन परिपत्रक दि.04 मे 2023 नुसार आहेत, याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी सहा.जिल्हा जलसंधारण अधिकारी पि.के. महामुनी यांचेशी दुरध्वनी क्र. 8999259962 वर संपर्क साधावा.

अशासकीय संस्था निवडीचे निकष:

अशासकीय संस्थेने नोंदणी प्रमाणपत्रासह त्यांचे 3 वर्षाचे ऑडिट केलेले कागदपत्रे अद्यावत असावे, गाळ काढण्यासाठी घेतलेल्या कामांच्या संख्येच्या प्रमाणात जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत व जलसाठा पातळीवर स्मार्टफोन डेटा प्रविष्ठ करण्यास सक्षम असणारे पुरेसे कर्मचारी वर्ग नेमणूक करण्यात अशासकीय संस्था सक्षम असावी, अशासकीय संस्थेकडे या पुर्वी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, जलसाठे, ग्रामणी विकास, जलसंधारण अंतर्गत यशस्वीरित्या कामे करण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. अशासकीय संस्थेकडे संनियंत्रण आणि मुल्यांकनावर काम करण्यास अनुभव असावा, सर्व अधिकार या विभागाकडे राखीव आहेत.असे जिल्हा जलसंधारण अधिकारी सि.के.कलशेट्टी यांनी  कळविले आहे.

                                   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top