google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 आदिवासी पारधी समाजाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार - जिल्हाधिकारी कीर्ति किरण पूजार

आदिवासी पारधी समाजाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार - जिल्हाधिकारी कीर्ति किरण पूजार

0



धाराशिव -
आदिवासी पारधी समाजाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ति किरण पुजार यांनी केले.

शबरी आवास योजनेंतर्गत घरकुल बांधकामाची पाहणी जिल्हाधिकारी कीर्ति किरण पुजार यांनी केली. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी आदिवासी पारधी समाज संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील काळे, नगरसेवक बापू पवार, दादा पवार आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कीर्ति किरण पुजार म्हणाले की, आदिवासी पारधी समाजाच्या विकासासाठी 389 घरकुल मंजूर आहेत. या घरकुलांचे
प्लास्टर राहिले आहे. त्यासाठी शून्य रॉयल्टी भरून वाळू उपलब्ध करून देण्यात येईल. जागेच्या पूर्ततेसाठी आठ अ आणि इतर कागदपत्र उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल. त्याचबरोबर येथे क्रिडांगण, व्यायाम शाळा, कायस्वरूपी पाणीपुरवठा योजना, पिण्याच्या पाण्यासाठी टाकी, जागेसाठी आठ आ, अंतर्गत रस्ते, अंगणवाडी व इतर कामे करण्याची ग्वाही जिल्हाधिकारी कीर्ति किरण पुजार यांनी दिली. यावेळी आदिवासी पारधी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top