प्रतिनिधी:-
खामसवाडी जिल्हा परिषद गटात भाजपकडून शंतनू पायाळ या नावाची सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. उच्चशिक्षित, व्यवसायीक आणि तरुण नेतृत्व म्हणून त्यांनी मतदारसंघात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
शंतनू पायाळ यांनी आतापर्यंत रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. त्यामुळे तरुण वर्गात त्यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण तयार झाले असून, त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.
भाजपचे सक्रिय युवा कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या शंतनू पायाळ हे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे विश्वासू कार्यकर्ते मानले जातात. पक्ष संघटन, सामाजिक उपक्रम आणि युवकांच्या प्रश्नांवर ते सातत्याने काम करताना दिसत आहेत.
सध्या ते मतदारसंघात सातत्याने दौरे करत असून, लोकांच्या गाठीभेटी घेत त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेत आहेत. नागरिकांशी थेट संवाद साधत प्रश्न सोडवण्यावर त्यांचा भर आहे.
विशेषतः तरुण वर्गामधून त्यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असून, आगामी काळात खामसवडी जिल्हा परिषद गटाच्या राजकारणात शंतनू पायाळ यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.


