शिंगोली (प्रतिनिधी):
आदर्श आश्रमशाळा शिंगोली येथे शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाशजी पारवे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षण परिषद उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाशजी पारवे साहेब, केंद्रप्रमुख सुकेशनीताई वाघमारे, सुनिता वाकुरे, दिपाली वाघमारे, केंद्रीय मुख्याध्यापक शेषेराव राठोड, विद्यानिकेत माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक अण्णासाहेब चव्हाण, पर्यवेक्षक रत्नाकर पाटील, आदर्श आश्रमशाळेचे मुख्याध्यापक सतीश कुंभार यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमात आदर्श शिक्षिका मंजुषा स्वामी, वनमाला लोखंडे तसेच आदर्श शिक्षक समीर जाधव व प्रकाश पवार यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. तसेच उपळा (मा.) केंद्रातील शाळांचे मुख्याध्यापक सतीश कानडे, शेषेराव राठोड, बाळासाहेब शिंदे, सविता देशमुख, रणजीत तुपारे व शेषेराव चव्हाण यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाशजी पारवे साहेब, केंद्रप्रमुख सुकेशनीताई वाघमारे, सुनिता वाकुरे, दिपाली वाघमारे आणि केंद्रीय मुख्याध्यापक शेषेराव राठोड यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, हार, बुके व फेटा बांधून सन्मान करण्यात आला.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रकाशजी पारवे साहेब म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिकाधिक शिष्यवृत्ती परीक्षांना बसवून त्यांची गुणवत्ता वाढवणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, डॉक्टर, अभियंता अशा उच्च पदांपर्यंत पोहोचावे यासाठी सर्व शिक्षकांनी एकत्र येऊन प्रामाणिक प्रयत्न करावेत. संत तुकाराम महाराजांच्या “एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ” या वचनाप्रमाणे परस्पर सहकार्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक रत्नाकर पाटील यांनी केले. यावेळी चंद्रकांत जाधव, खंडू पडवळ, दीपक खबोले, प्रशांत राठोड, कैलास शानिमे, मल्लिनाथ कोणदे, विशाल राठोड, सचिन राठोड, सुरेखा कांबळे, ज्योती राठोडे, ज्योती साने, बालिका बोयणे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सागर सूर्यवंशी, गोविंद बनसोडे, सचिन अनंतकळवास, अमोल जगताप, रेवा चव्हाण, लिंगा आडे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


