धाराशिव :
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेना धाराशिव जिल्हा संघटकपदी राणा बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी राणा बनसोडे यांच्याकडून शिवसेना पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवले जातील तसेच युवासेना व पक्ष संघटना अधिक बळकट केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमास शहरप्रमुख सोमनाथ गुरव, युवासेना जिल्हाप्रमुख रवी वाघमारे, नगरसेवक पंकज पाटील, राज निकम, संभाजी मामा सलगर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


