शासन आपल्या दारी अभियानामुळे सर्व योजना घर बसल्या मिळणार ---तहसीलदार चंद्रकांत शिंदे
उस्मानाबाद,दि,14(जिमाका):- सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत यासाठी शासन जनतेच्या दारी जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान मोठ्या दिमाखात सुरू करण्यात आलं आहे.
शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी जलदगतीने व्हावी यासाठी शासनातर्फे हे अभियान राबविण्यात येत आहे. असे तहसीलदार चंद्रकांत शिंदे म्हणाले.
या अभियानांतर्गत शासकीय योजनांशी संबंधित कार्यालयांचे प्रतिनिधी आणि विविध कागदपत्रे उपलब्ध करून देणारे अधिकारी व कर्मचारी एकाच छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचा लाभ देणार आहेत यासाठी योजनेचे नाव शासन आपल्या दारी असे दिले आहे.
शासन आपल्या दारी उपक्रमाचा एक भाग म्हणून सर्वसामान्यांच्या विकासासाठी या अभियानाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार चंद्रकांत शिंदे व प्रशासनाने केले आहे. यावेळी अनेक लाभार्थ्यांना बी बियाणे अनेक शेतकऱ्यांना धनादेश व प्रमाणपत्र देऊन शेतकऱ्यांचे व सर्वसामान्यांचे गौरव करण्यात आला यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, नितीन काळे, शफी भाई शेख, कमलाकर चव्हाण, माजी नगराध्यक्ष नय्यर जागीरदार. माजी नगराध्यक्ष शहबाज काझी. माजी नगरसेवक मुस्ताक कुरेशी माजी नगरसेवक इमाम शेख. कल्पना गायकवाड. माजी नगरसेवक बसराज धरणे ज्ञानेश्वर घोडके. संतोष पुदाले. सरदार सिंग ठाकूर .गावातील प्रतिष्ठ नागरिक तसेच प्रशासकीय अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


