महाबीज प्रक्रिया केंद्रास जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांची भेट
उस्मानाबाद,दि.14(प्रतिनिधी):- उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथील महाबीज प्रक्रिया केंद्रास जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी आज भेट देऊन पाहणी केली.
यावेळी प्रियंवदा म्हद्दलकर (भा.प्र.से.), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक श्री माने, उपविभागीय कृषी अधिकारी श्री.असलकर, तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे, तालुका कृषी अधिकारी श्री.जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यांनी महाबीज प्रक्रिया केंद्राचे कार्य, केंद्रामार्फत केल्या जाणाऱ्या विविध पीकांच्या बीज प्रक्रिया, ब्रीडींगची प्रक्रिया कशी केली जाते? याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.


