जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचा फायदा घेत स्पर्धा परीक्षांची तयारी करावी- सुर्यवंशी
उस्मानाबाद,दि,14():-विद्
जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सुर्यवंशी यांची नांदेड येथे बदली झाल्यानिमित्त त्यांचा नूतन ग्रंथालयाच्या इमारतीमध्ये सार्वजनिक ग्रंथालयाचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.एच. निपाणीकर, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष व. ग. सुर्यवंशी, अक्रुर सोनटक्के, सु. चि. आचार्य आदी उपस्थित होते. पुढे बोलताना सुर्यवंशी म्हणाले की, उस्मानाबाद येथे ग्रंथालयलयाची नूतन व अद्ययावत इमारत उभी करण्यात यावी यासाठी जागा शोधण्यापासून ते संबंधित विभागाच्या मान्यता मिळविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला त्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाने देखील अत्यंत महत्त्वाचे व मोलाचे सहकार्य केल्यामुळे साडेसहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. यामध्ये मुली व मुलांना स्वतंत्रपणे बसण्यासाठी आधुनिक व अद्यावत १७ विभाग तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. व.ग. सुर्यवंशी म्हणाले जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुर्यवंशी यांनी वाचनालयाची नवीन इमारत उभी रहावी यासाठी काम केले असून असे अधिकारी दुर्मिळ असतात. यावेळी श्री.निपाणीकर आणि आचार्य यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ग्रंथालयाचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावतीने सुर्यवंशी यांचा फेटा, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन येथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी संतोष पवार, हभप ज्ञानेश्वर सुर्यवंशी महाराज, सुरेश जोशी आबासाहेब अडसूळ तानाजी लिके अण्णासाहेब चौधरी, प्र. गो. राठोड, एस.एन. भोरे, अणदूरकर, बुकन आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


