google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 तलाठी पदभरती साठी जिल्हाधिकारी कार्यालयात मदत कक्ष स्थापन

तलाठी पदभरती साठी जिल्हाधिकारी कार्यालयात मदत कक्ष स्थापन

0
 तलाठी पदभरती साठी जिल्हाधिकारी कार्यालयात मदत कक्ष स्थापन

 

         उस्मानाबाद,दि.14(प्रतिनिधी):-  महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील गट-क संवर्गातील तलाठी पदभरतीच्या अनुषंगाने महसूल व वन विभाग यांच्याकडील तलाठी (गट-क) संवर्गाची सरळसेवा पदभरती प्रक्रिया राबवून संपूर्ण भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी शासन स्तरावरुन जाहिरात प्रसिध्दी देण्यात येणार असून, तलाठी पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी तसेच त्यांना मार्गदर्शन करण्याकरिता जिल्हास्तरावर मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहे.

          यामध्ये उमेदवारांना अर्ज करताना काही अडचणी निर्माण झाल्यास निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी (9423777565, 02472-227301) आणि महसूल सहायक विजय पाटील (8459465796, 02472-225195) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top