तुळजापूर : भारत राष्ट्र समितीचे महाराष्ट्र राज्याचे समन्वयक माणिकराव कदम यांचा भारत राष्ट्र समितीचे सदस्य सुनील चव्हाण यांनी उस्मानाबाद शहरातील रेस्ट हाऊस येथे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
उस्मानाबाद जिल्ह्यातील भारत राष्ट्र समितीची सदस्य नोंदणी सुरू आहे तुळजापूर तालुक्यातील सदस्य नोंदणी सुनील चव्हाण हे करत आहेत. ग्रामीण भागामध्ये मोठा प्रतिसाद देखील मिळत आहे.
त्यावेळी राज्याचे समन्वयक कदम यांच्यासोबत सुनील चव्हाण यांनी विविध विषय संदर्भात चर्चा केली भारत राष्ट्र समितीचे जिल्हा समन्वयक रामजीवन बोंदर, संजय भिसे, शशिकांत बेगमपुरे, अरविंद घोडके, सुरज बचाटे, किरण चव्हाण, विक्रम चव्हाण, ऍड रुपेश माळजे पाटील यांच्या सह मोठ्या संख्येने संदस्य उपस्थित होते.


