google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 ढोकी येथील स्वयंचलित हवामान केंद्राला जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यांची भेट

ढोकी येथील स्वयंचलित हवामान केंद्राला जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यांची भेट

0


ढोकी येथील स्वयंचलित हवामान केंद्राला जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यांची भेट

 

         उस्मानाबाद,दि.14(प्रतिनिधी):-  उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथील कार्यान्वित स्वयंचलित हवामान केंद्राला जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी आज भेट दिली.

          यावेळी  प्रियंवदा म्हद्दलकर (भा.प्र.से.), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने, उपविभागीय कृषी अधिकारी श्री.असलकर, तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे, तालुका कृषी अधिकारी श्री.जाधव आदी उपस्थित होते.

या हवामान केंद्रातून प्रत्येक दहा मिनिटाला पाऊस, तापमान, आद्रता, वाऱ्याचा वेग इत्यादी मोजमाप केले जाते. कृषी विभाग व स्कायमेट यांच्या माध्यमातून महावेध ही प्रणाली सध्या जिल्ह्यामधील एकूण 57 महसूल मंडळामध्ये कार्यान्वित आहे. याव्यतिरिक्त या वर्षभरात एकूण 223 स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचे नियोजन चालू आहे, अशी माहिती यावेळी महावेधच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top