Osmanabadnews - उस्मानाबाद शहरातील प्रभाग क्रमांक चार आणि एकमध्ये रस्त्यारस्त्यांवर चिखलाचा खच साचला असून नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. याकडे नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे जनतेची चिखलातून पायपीट सुरू आहे. चिखलात घसरून नागरिकांचे अपघात होत आहेत. अशा स्थितीत आजच मी शिवसेना उपशहरप्रमुख पदाचा राजीनामा दिला.
याबाबत लवकरच पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. परंतु जनतेच्या प्रश्नांसाठी 31 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार्या मोर्चा आणि ठिय्या आंदोलनावर आपण ठाम असल्याची भूमिका प्रशांत साळुंके यांनी व्यक्त केली आहे.
प्रभागातील नागरी समस्यांबाबत शुक्रवारी (दि.28) प्रशांत साळुंके यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले की, भूमिगत गटारीच्या कामामुळे प्रभाग चार आणि एकमधील जनतेची चिखलामधून पायपीट सुरू आहे. चिखलात वाहने घसरत असल्यामुळे अपघात घडत आहेत. या प्रश्नावर यापूर्वी नगर परिषदेसमोर चिखलफेक आंदोलन केले. तरीदेखील झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाने दखल न घेतली नाही. म्हणून झोपेचे सोंग घेतलेल्या नगर परिषद प्रशासनाला जागे करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून नगर परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. पक्षाच्या पदाचा राजीनामा दिलेला असला तरीही सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी कायम लढत राहणार आहे. प्रशासन ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचेही प्रशांत साळुंके यांनी म्हटले आहे.