उस्मानाबाद शहरातील उद्यान विकसीत करणे व आठवडे बाजार विकसीत करणे व नवीन सिमेंट कॉक्रिट रस्ते करणे यासाठी शिंदे सरकारकडून १४ कोटी रुपये निधी मंजूर - सुरज साळुंखे
उस्मानाबाद / osmanabadnews : उस्मानाबाद शहरातील उद्यान विकसीत करणे व आठवडे बाजार विकसीत करणे व नवीन सिमेंट कॉक्रिट रस्ते करणे यासाठी शिंदे सरकारकडून 14 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आले आहे अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उस्मानाबादचे पालकमंत्री डॉ. तानाजीराव सावंत साहेब व शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या प्रयत्नातुन उस्मानाबाद शहरासाठी उद्यान विकसीत करणे व आठवडे बाजार विकसीत करणे व नवीन सिमेंट कॉंक्रिट रस्ते करणे यासाठी शिंदे सरकारकडून 14 कोटी रुपये उस्मानाबाद शहरासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत ते कामे वैशिष्ट्यपुर्ण योजनेअंतर्गत उस्मानाबाद शहरातील आठवडी बाजार येथे भाजी मार्केट, मटन मार्केट विकसित करणे 5 कोटी रुपये व साळुंके नगर येथे ओपन स्पेस मध्ये कंपाउड वॉल व गार्डन विकसीत 3 कोटी रुपये , पोलीस लाईन येथील कालिका माता मंदीरासमोर ओपन स्पेस मध्ये 2 कोटी रुपये कंपाउड बॉल व गार्डन विकसीत करणे , वैराग रोड येथील गार्डन विकसीत करणे 1 कोटी रुपये , राम नगर येथे ठोंबरे यांच्या घरासमोर ओपन स्पेस मध्ये कंपाउड वॉल व 1 कोटी रुपये गार्डन विकसीत करणे , उस्मानाबाद नगरपरिषद अंतर्गत विशेष रस्ता अनुदान या योजनेअंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ते बनविणे दोन कोटी रुपये असा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे यांनी दिली आहे.