उस्मानाबाद शहरातून जाणाऱ्या उस्मानाबाद सोलापूर महामार्गावरील खड्ड्यात बेशामाची व बाबळीचे झाडे लावून नागरिकांचे आंदोलन , Osmanabad Solapur Highway
Osmanabadnews : आज उस्मानाबाद शहरातून जाणाऱ्या उस्मानाबाद सोलापूर महामार्ग रस्त्यावर पाऊसामुळे खड्डे पडले असून यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे हा रस्ता रहिदरीचा असून या रस्त्यावरील देशपांडे स्टँड येथील धारासुर मर्दिनी कमानी जवळ मोठ मोठे खड्डे पडले असून सध्या पाऊस चालू असून खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना रस्त्यावरील खड्डे दिसत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
दोन दिवसात आठ ते दहा अपघात झाले आहेत यामुळे आज धारासुर मर्दिनी कमान येथील नागरिकांच्या वतीने या महामार्गावरील खड्ड्यात बेशर्माचे व बाबळीचे झाडे लावून आंदोलन करण्यात आले व पुढील दोन दिवसात खड्डे बुजवले नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी संकेत साळुंके,अभिजित कोकाटे, जगधिश जाधव,आकाश केदार,संतोष शेरकर,बापू इंगळे,दादा पवार, मच्छिंद्र हवलादर,रवी माळी आदीं उपस्थित होते