आनंद नगर पोलीस ठाण्यातील हावलदारावर फसवणूकीचा गुन्हा दाखल , A case has been registered against the police constable
Osmanabadnews : आनंदनगर पोलीस ठाणे : आरोपी नामे- प्रविण गणपतराव तावशीकर पोलीस हावलदार/632 पोलीस ठाणे आनंदनगर यांनी दि.13.11.2020 ते दि.27.01.2023 या कालावधीत पोलीस ठाणे आंनदनगर येथे कॅश मोहरर या पदाचा गैरवापर करुन पोलीस ठाणे आनंदनगर येथील पोलीस संरक्षण तसेच कोरोना काळातील केलेल्या दंडात्मक कारवाईमध्ये आकारलेल्या दंडनीय शुल्काची नोंद शासकीय किर्द वर कुठेही न करता व शासन खाती चलनाव्दारे बॅकेत भ्रना न करता एकुण 06,78,364 ₹ स्वताच्या फायद्यासाठी वापर करुन नमुद रक्कमेचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- गोरक्षनाथ रोहीदास खरड, सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे, आनंदनगर यांनी दि.29.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 420, 409 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.