पालकमंत्री प्रा.डॉ.श्री.तानाजी सावंत यांच्या हस्ते टीबी मुक्त पंचायत अभियान चे उद्घाटन

0


पालकमंत्री प्रा.डॉ.श्री.तानाजी सावंत  यांच्या हस्ते टीबी मुक्त पंचायत अभियान चे उद्घाटन

 

उस्मानाबाद,दि.15 ( osmanabadnews ):- आज 15 ऑगस्ट रोजी आजादी का अमृत महोत्सवाच्या सांगता वर्षाचे औचित्य साधून पालकमंत्री कार्यालयात पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते " टीबी मुक्त पंचायत अभियान"  चे उद्घाटन करण्यात आले.

       या अभियानामध्ये जिल्हयातील 75 ग्रामपंचायतची निवड करण्यात आली आहे. या अभियानाच्या माध्यमातून 1 लाख 17 हजार 750 लोकांची तपासणी करण्यात येणार आहे.

         “प्रधानमंत्री टिबीमुक्त भारत अभियान" या उपक्रमांतर्गत जिल्हयामध्ये सध्या उपचारावरील 1200 क्षयरुग्ण आहे. 988 क्षयरुग्णांनी पोषण आहार किटसाठी संमती दिली आहे.

     पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात 10 क्षयरुग्णांना पोषण आहार किट वाटप करण्यात आली.मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.उस्मानाबाद यांच्या आवाहनानंतर आरोग्य विभाग व जिल्हा परिषदेअंतर्गत विविध विभाग असे 264 जणांनी निक्षय मित्र बनुन 384 क्षयरुग्णांना पोषण आहार किट वाटप करण्यात आले आहे.या उपक्रमांर्गत दानशुर व्यक्ती, संस्था निक्षय मित्र बनुन उपचाराखालील क्षयरुग्णांना दत्तक घेऊन उपचार संपेपर्यंत दरमहा पोषण आहार धान्य गहु,ज्वारी, किलो,दाळी-1.5 किलो, खाद्यतेल - 250 ग्रॅम, दुध पावडर - 1 किलो इत्यादी देऊ शकतात यासाठी सर्वानी आपले योगदान दयावे.निदान झालेल्या क्षयरुग्णास उपचाराबरोबरच आहाराची आवश्यकता असते. जेणेकरुन क्षयरोगावर मात करण्यासाठी मदत होते.

         यावेळी पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांनी समाजसेवी संस्था, प्रतिष्ठित नागरीक व दानशुर व्यक्ती यांनी पुढे येवून निक्षय मित्र बनुन आपआपल्या भागातील निदान झालेल्या क्षयरुग्णांस पोषण आहार किट देण्यास पुढाकार घ्यावा.असे आवाहन त्यांनी केले.

           यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती प्राजंल शिंदे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरीदास,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राज गलांडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रफीक अन्सारी, डॉ. विवेक होळे  व जिल्हा क्षयरोग कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top