उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान उस्मानाबाद ग्रामीण पोलीसांनी दि.28.08.2023 रोजी 18.20 वा. सु. उस्मानाबाद ग्रामीण पो.ठा. हद्दीत 2 छापे टाकले. यावेळी आरोपी नामे -1) राहुल त्रिंबक मोरे, वय 38 वर्षे, रा. योडशी ता. जि. उस्मानाबाद, हे खंयोडशी येथील दिल्ली दरबार चौकात गोल्डन स्क्रॅप दुकानाच्या बाजूस कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह एकुण 1,020 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. तर आरोपी नामे 2) बालाजी शिवाजी शेळके, वय 31 वर्षे, रा. येडशी ता. जि. उस्मानाबाद हे योडशी येथील रामलिंग मंदीराचे पाठीमागे असणारे धबधब्याचे वरील बाजूस लाल टायगर आडी मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह एकुण 800 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये उस्मानाबाद शहर पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
बेंबळी पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान बेंबळी पोलीसांनी दि.29.08.2023 रोजी 20.45 वा. सु. बेंबळी पो.ठा. हद्दीत छत्रपती शिवाजी चौक येथील त्रिमुर्ती पान शॉपचे बाजूला झाडाखाली बेंबळी येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे -1) सतीश पांडुरंग सोनटक्के, वय 37 वर्षे, रा. बेंबळी ता. जि. उस्मानाबाद, हे छत्रपती शिवाजी चौक येथील त्रिमुर्ती पान शॉपचे बाजूला झाडाखाली बेंबळी येथे मुंबई मेन बाजार मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह एकुण 550 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये बेंबळी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान येरमाळा पोलीसांनी दि.29.08.2023 रोजी 14.30 वा. सु. येरमाळा पो.ठा. हद्दीत येडश्वरी मंदीर कमानी समोर पत्राचे शेडमध्ये छापा टाकला. यावेळी आरोपी नामे -1) राहुल तात्याबा ओव्हाळ, वय 38 वर्षे, रा. भिमनगर, येरमाळा ता.कळंब जि. उस्मानाबाद, हे येडश्वरी मंदीर कमानी समोर पत्राचे शेडमध्ये कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह एकुण 527 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये येरमाळा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.