उस्मानाबाद जिल्ह्यात तीन ठिकाणी चोरी गुन्हे दाखल

0



उस्मानाबाद जिल्ह्यात तीन ठिकाणी चोरी गुन्हे दाखल 

 

उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे- प्रगती आशुतोष पवार, वय 24 वर्षे, रा. गणेश नगर, मुरुम ता. उमरगा जि. उस्मानाबाद ह्या दि.28.08.2023 रोजी 13.30 ते 13.40 वा. सु. सोनार गल्लीतील गणपती मंदीराजवळल कपड्याच्या दुकानात उस्मानाबाद येथे झुमक्यांना फिरक्या बसवून झुमके पर्स मध्ये ठेवून ती पर्स कापडी पिशवी मध्ये ठेवली व कपडे खरेदी करत असताना दोन अनोळखी महिला यांनी प्रगती पवार यांची कापडी पिशवी फाडून त्यामधील अंदाजे 45,000₹ किंमतीचे 14 ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुमके चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी प्रगती पवार यांनी दि.29.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद शहर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 379,34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग पोलीस ठाणे : आरोपी नामे- दिलीप हनमंत जाधव, वय 20 वर्षे रा. धनराज विलास जाधव, वय 13 दोघे रा. सांगवी गोसावी वस्ती ता. अक्कलकोट जि. सोलापूर यांनी दि.28.08.2023 रोजी 11.00 वा. सु. काटगाव ता. तुळजापूर शिवारातील एक पांढरे रंगाचे सुपर कॅरी वाहन क्र एमएच 13 डीक्यु 2141 किंमत अंदाजे 85,000₹ व बंधाऱ्याचे दोन लोखंडी दरवाजे  11,000₹ असा एकुण 96,000₹ किंमतीचा माल चोरुन घेवून जात असताना मिळून आले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-साधु चंद्रकांत माळी, वय 40 वर्षे, व्यवसाय पोलीस पाटील रा. काटगाव ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांनी दि.29.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

वाशी पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- पोपट सुखदेव मोटे, वय 55 वर्षे रा. गिरवली ता. भुम जि. उस्मानाबाद यांनी दि.28.08.2023 रोजी 18.00 ते दि. 29.08.2023 रोजी 10.00 वा. सु. अंजनसोडां शिवारातील शेत गट नं 100 व 101 मध्ये खडी क्रेशरवर लावलेली जे.सी.बी व टिप्परचे अंदाजे 150 लि. डिझेल अंदाजे 15,000₹ व टिप्पर मधील दोन बॅटऱ्या अशा तिन टिप्पर मधील सहा बॅटऱ्या एकुण 28,000₹ असा एकुण 43,000 ₹ किंमतीचा माल अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-पोपट मोटे यांनी दि.29.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी  पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top