सहकार विभाग पदभरती १४ व १५ ऑगस्ट रोजी ऑनलाईन परीक्षा - online paper

0



सहकार विभाग पदभरती १४ व १५ ऑगस्ट रोजी ऑनलाईन परीक्षा - online paper 

 

उस्मानाबाद,दि.9(osmanabadnews ): सहकार विभागातील गट-क संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरिता विहीत मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची टी.सी.एस. या कंपनीमार्फत सोमवार दि.14 ऑगस्ट आणि बुधवार दि.16 ऑगस्ट रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे.

या परीक्षेच्या प्रवेशपत्राबाबतच्या सूचना अर्ज सादर करतेवेळी नोंदणीकृत केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांक आणि ई-मेल आयडी यावर पाठविण्यात आल्या आहेत. तसेच प्रवेशपत्र डाऊनलोड करावयाची लिंक आणि याबाबतच्या सूचना पुणे येथील सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था यांच्या http://sahakarayukta.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.

उमेदवारांनी दिलेल्या संकेतस्थळावरुन परीक्षेचे प्रवेशपत्र प्राप्त करावे आणि परीक्षेस येताना त्याची रंगीत प्रत सोबत ठेवावी. तसेच प्रवेशपत्रात नमूद सूचनांचे उमेदवारांनी तंतोतंत पालन करण्याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सुनिल शिरापुरे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top